घरताज्या घडामोडीपॉवरलूम चालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती

पॉवरलूम चालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती

Subscribe

कामगारांना देणार पास : आज मालेगावी बैठक

 

गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेल्या पॉवरलूम सुरू करण्यासाठी शासनाने परवानी दिली आहे. त्यामुळे लवकरच हे पॉवरलूम सुरू होउन मजूरांच्या हाताला काम मिळणार आहे. मात्र कंटेनमेंट झोन बाहेरील पॉवरलूम सुरू होवू शकतील. पॉवरलूम चालकांच्या अडचणी सोडविण्याकरीता जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली असून या समितीमार्फत पॉवरलूम चालकांना येणार्‍या अडचणी सोडविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तसेच पॉवरलूम चालकांची गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत पॉवरलूम सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

करोनाच्या संसर्गामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगांव शहराचा सामावेश रेड झोनमध्ये करण्यात आला. मालेगांवमध्ये रूग्णांची संख्या ७००हून अधिक झाल्याने मालेगांवची परिस्थिती नियंत्रणात आणणे हे प्रशासनासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. रूग्णसंख्या जरी वाढत असली तरी, रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने शहरातील पॉवरलूम सुरू करावेत अशी मागणी पॉवरलूम चालकांनी केली. मालेगांव शहरात सुमारे तीन लाख पॉवरलूम आहेत. यात सुमारे साडेतीन लाख मजूर काम करतात. मात्र गेल्या दोन महीन्यांपासून येथील कारखाने बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कामगारांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला. सामाजिक संस्था, शासनाच्या मदतीने नागरिकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मात्र आता पुढे काय असा प्रश्न येथील मजूरांना भेडसावू लागला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील यंत्रमाग कारखाने बंद असल्याने अर्थचक्रही मंदावलेे. याचा फटका कामगारांना सर्वाधिक बसतो आहे. मालेगांवमध्ये कंटेनमेंट झोनमध्ये वाढ झाल्याने उद्योगधंदे सुरू होण्यास अडचणी निर्माण झाल्या. मात्र शासन निर्देशानूसार कंटेनमेंट झोनच्या नियमावलीत बदल करण्यात आला. त्यानूसार आता मालेगावमध्ये कंटेनमेंट झोन ११९ वरून ४५ पर्यंत मर्यादित करण्यात आले. त्यामूळे कंटेनमेंट झोन वगळता पॉवरलूम सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. केंद्र व राज्य शासनाच्या नव्या निर्देशानुसार शहरातील यंत्रमाग कारखाने सुरू करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहे. कंटेनमेंट झोन वगळता शहरातील ५० टक्के कारखाने येत्या १ जूनपासून सुरू करण्यात येतील. तत्पूर्वी कारखाने सुरू होत असताना करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत.

या उपाययोजना करणार
प्रतिबंधित क्षेत्र वगळून कारखाने सुरू होणार
कारखानदार, कामगारांना मास्क बंधनकारक
सॅनिटायझरचा वापर अनिवार्य
डिजिटल एक्स रेद्वारे कामगारांचे तपासणी
संशयित असल्यास उपचारासाठी दाखल करणार

- Advertisement -

कामगारांना पास देणार
शासन निर्देशानूसार पॉवरलूम सुरू करण्यासाठी मालेगावसाठी विशेष सवलत दिली आहे. पण केवळ कंटेनमेंट झोन बाहेरचेच पॉवरलूम सुरू होउ शकतील. आणि कंटेनमेंट झोनच्या बाहेरचेच लोक तेथे काम करू शकतील. कामगारांना पासेस दिले जातील. यंत्रमागधारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, महापालिका उपायुक्त, कामगार उपायुक्त, आणि पोलीस अधिकारी यांची एक समिती गठित करण्यात आली असून या समितीमार्फत पावरलूमला परवानगी देण्यात येईल. याबाबत गुरूवारी बैठक घेण्यात येणार आहे.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -