घरमहाराष्ट्रनाशिकऑलिम्पिकपासून दूर ठेवण्यासाठीच षड्यंत्र

ऑलिम्पिकपासून दूर ठेवण्यासाठीच षड्यंत्र

Subscribe

राष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ याचा जिल्ह्यातील उद्योजकांसह वर्ग-१च्या अधिकाऱ्यांवर आरोप, विवाह मान्य करतानाच आरोप मात्र फेटाळले

पैशांसाठीच आपली बदनामी केली जात असून, हे सर्व जागतिक ऑलिम्पिकपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र आहे. त्यामागे  नाशिक जिल्ह्यातील उद्योजक व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याचा धक्कादायक आरोप रोईंगपटू दत्तू भोकनळ याने गुरुवारी, ३० मे रोजी केला. दरम्यान, न्यायालयीन सुनावणीनंतर आपल्याला विवाह मान्य असल्याचे त्याने कबुल केले.

आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ यांच्यावर १६ मे रोजी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश एन.जी.गिमेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने तडजोडीसाठी दिलेल्या वेळेत दत्तू व पत्नी आशा या दोघांमध्ये समझोता झाला आणि दत्तू भोकनळ याने विवाह मान्य असल्याचे कबूल केले. आशा दत्तू भोकनळ यांच्या तक्रारीनुसार त्यांचा विवाह झालेला असतानाही दत्तूला मान्य नव्हता.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर दत्तू भोकनळ याने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. आपल्याकडे प्रारंभी कमी रकमेची मागणी केली गेली. ती देण्यास नकार दिल्याने मोठी रक्कम मागितली. ही रक्कम किती होती, ते न्यायालयाच्या माध्यमातून समोर येईल. रक्कम न दिल्यानेच आपली बदनामी केली जाते आहे. जागतिक ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू द्यायचे नसल्यानेच हे सर्व षड्यंत्र घडवून आणले जात असल्याचा आरोपही त्याने केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -