घरमहाराष्ट्रनाशिकखेकड्यांमुळे धरणांना धोका; माधव चितळेंचाही दुजोरा

खेकड्यांमुळे धरणांना धोका; माधव चितळेंचाही दुजोरा

Subscribe

नामदेव पठाडे यांचे संशोधन ‘आपलं महानगर’ने पुढे आणल्यानंतर आता चितळे यांनीदेखील त्यास दिला दुजोरा

खेकड्यांमुळे मातीच्या धरणांना धोका पोहोचू शकतो, असे मत प्रसिध्द जलतज्ज्ञ माधव चितळे यांनीही व्यक्त केले आहे. मेरीचे सेवानिवृत्त वैज्ञानिक संशोधन अधिकारी नामदेव पठाडे यांचे संशोधन ‘आपलं महानगर’ने पुढे आणल्यानंतर आता चितळे यांनीदेखील त्यास दुजोरा देत मातीची धरण क्षेत्रातील खेकड्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यांचा उपद्रव महागात पडू शकतो असे म्हटले आहे.

तिवरे धरण फुटीनंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी खेकड्यांमुळे हे धरण फुटल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झडली. तिवरे धरण फुटीची कारणे वेगळी असली तरीही खेकड्यांमुळे धरण फुटू शकते ही बाब ‘आपलं महानगर’ने पठाडे यांच्या संशोधनाच्या माध्यमातून पुढे आले. त्यामुळे ही चर्चा एकतर्फी न होता त्याची दुसरी बाजूही पुढे आली. प्रसिध्द जलतज्ज्ञ माधव चितळे यांनी देखील खेकड्यांच्या उपद्रवावर प्रकाशझोत टाकला आहे. ते म्हणाले की,
कालव्यांमध्ये, मातीचे धरण असलेल्या भागात हे खेकडे ओल शोधण्यासाठी सुमारे ५ ते ६ मीटरपर्यंत पोखरतात. त्यानंतर जेव्हा पाऊस येतो, तेव्हा या छिद्रांमध्ये पाणी शिरुन गळतीला सुरुवात होते. ही गळती तातडीने दुरुस्त न केल्यास तिच्यात वाढ होऊन धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच ज्या धरणांच्या परिसरात खेकडे असतात तेथे मातीचे धरण तयार करताना पाण्याच्या बाजूने सुरुवातीला दगडाचा थर तयार केला जातो. त्यावर मुरुम, वाळू टाकली जाते. यामुळे खेकडे आपल्या बिळापर्यंत जाण्यास अडथळा तयार होतो. पाण्याचा साठा वाढताच पाण्यासोबत मुरुम आणि वाळू देखील वाहून या बिळे बंद होण्यास मदत होत, असेही चितळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -