घरदेश-विदेशतुमच्या बँकांना विचारा आणि मग चोर कोण ते ठरवा - विजय मल्ल्या

तुमच्या बँकांना विचारा आणि मग चोर कोण ते ठरवा – विजय मल्ल्या

Subscribe

विजय मल्ल्याने वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलची लंडनमध्ये भेट घेतली. या भेटीचा फोटो गेलने ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला शेअर करत मल्ल्याने आपण चोर नसल्याचे म्हटले आहे.

भारताच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) ९००० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन विदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने लंडनमध्ये नुकतेच वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलची भेट घेतली आहे. या भेटीनंतर गेलने दोघांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. या फोटोला रिट्विट करत मल्ल्याने आपण चोर नसल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षभरापासून आपण भारतीय बँकेला पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, बँकच पैसे घेत नसल्याचा दावा मल्ल्याने केला आहे. यासोबतच त्याने आपल्या ट्विटमध्ये ‘मला चोर बोलणाऱ्यांनो आधी तुमच्या बँकला विचारा आणि मग चोर कोण ते ठरवा’, असे म्हटले आहे.

गेलने ट्विटरवर शेअर केला फोटो

सध्या लंडनमध्ये विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. वेस्ट इंडिजला साखळी खेळातच मिळालेल्या अपयशामुळे विश्वचषकातील या संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, ख्रिस गेल सध्या लंडनमध्येच आहे. दरम्यान, एसबीआय बॅंकेला चूना लावून पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या सध्या लंडनमध्येच वास्तव्याला आहे. त्याने गेलची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो गेलने ट्विटर शेअर केला. त्यानंतर चाहत्यांनी दोघांना भरपूर ट्रोल केले. दरम्यान, विजय मल्ल्याने गेलचे ट्विट रिट्विट केले.

- Advertisement -

काय म्हणाला विजय मल्ल्या?

विजय मल्ल्या ट्विटमध्ये म्हणाला की, माझा प्रिय मित्र आणि युनिव्हर्सल बॉसला भेटून मला प्रचंड आनंद झाला. काही लोक मला चोर समजतात. मात्र, मी चोर नाही. तुम्ही तुमच्या बँकेला विचारा आणि मग ठरवा कोण चोर आहे ते. मी गेल्या वर्षभरापासून बँकेला पैसे देण्यास तयार आहे. मात्र, बँक पैसे घेण्यास नकार देत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Video : चाहत्याच्या आईने केली बुमराहची नक्कल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -