घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसराईत गुन्हेगाराची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी

सराईत गुन्हेगाराची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Subscribe

उपनगर, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत माजविणार्या सराईत गुन्हेगाराविरोधात स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनुसार सराईत गुन्हेगारास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे. जय उर्फ मार्या उर्फ मारुती वाल्मिक घोरपडे (२१, रा. विहितगाव, नाशिकरोड) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

सराईत गुन्हेगार जय याच्याविरोधात नाशिकरोड, उपनगर या पोलिस ठाण्यांमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखविणे, जबर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, प्राणघातक हल्ला, महिलांची छेडछाड, अपहरण, मनाई आदेशाचे उल्लंघन कररे यासारखे सुमारे ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. जय याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याच्यात सुधारणा न झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात आणखी काही सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर स्वरुपाच्या कारवाई केल्या जाणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -