घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसराईत गुन्हेगाराची तुरुंगात रवानगी

सराईत गुन्हेगाराची तुरुंगात रवानगी

Subscribe

नाशिक शहरातील टोळीयुद्ध थांबविण्यासाठी आणि गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कारवाया केल्या जात आहेत. देवळाली कँम्प पोलीस ठाणे हद्दीतील कॅथे कॉलनीतील सराईत गुन्हेगार छोटू मोहन नायडू (वय ३०) याची शुक्रवारी (दि.५) तुरुंगात रवानगी करण्यात आली. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी फेब्रुवारीमध्ये चार सराईत गुन्हेगारांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

छोटू नायडू याने लॅमरोड, लेव्हिट मार्केट, रेस्ट कॅम्परोड, देवी मंदिर परिसरात दहशत कायम ठेवण्यासाठी नागरिकांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार व मारहाण केली होती. त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात दंगा करणे, विनयभंगासाठी हल्ला करणे, दुखापत करणे, गृह अतिक्रमण करणे, घातक हत्यारांसह जमावात सामील होणे, शांतता भंगसाठी अपमान करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करुन दशहत निर्माण करुन शहरातील सार्वजनिक व्यवस्थेस बाधा निर्माण करुन जनजीवन विस्कळीत केले होते. शहरातील जनजीवन विस्कळीत करणार्‍यांवर एमपीडीए अंतर्गत प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -