घरमहाराष्ट्रनाशिकगुलाबचा फटका ! जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर पिकांची नासाडी

गुलाबचा फटका ! जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर पिकांची नासाडी

Subscribe

६७४ गावांतील दोन लाख शेतकरी चक्रिवादळाने बाधित

 नाशिक: नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात आलेल्या गुलाब चक्रीवादळाच्या तडाख्याने सुमारे १ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके या वादळाच्या तडाख्यात सापडली. या नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाने १४७ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात गुलाब चक्रीवादळाने चांगलाच तडाखा दिला होता. यात जिल्ह्यातील ४३ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. त्याचा मोठा फटका शेतीला बसला. मालेगाव, नांदगाव, दिंडोरी, निफाड तालुक्यांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. मका, कांदा, कापूस, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, द्राक्षपिकाचे सर्वाधिक
नुकसान झाले.

- Advertisement -
  • मका ६८,२०७.७७ हे.
  • कांदा ३०,९९८.४५ हे.
  • कापूस २७,९९७.३० हे.
  • सोयाबीन १३,९६७.५० हे.
  • ज्वारी ४४१.४८ हे.
  • भाजीपाला १३२६.८२ हे.
  • द्राक्ष २८०.३० हे.
  • डाळिंब ७०२९.७१ हे.
  • पेरू २३९.४२ हे.

पीकनिहाय नुकसान

  • जिरायत १, ३१,७२०.७२ हे.
  • बागायत ३२,३५५.४२ हे.
  • वार्षिक फळपिके १३५.८९ हे.
  • बहुवार्षिक फळपिके ७६५५.५० हे.

१४७ कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी

गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना द्यावयाच्या मदतीसाठी १४७ कोटी २१ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरेयांनी सांगितले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -