घरमहाराष्ट्रनाशिकगुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

Subscribe

गुढीपाडव्यासाठी हार-कंगण, वेळूची काढी, रेशमी वस्त्रांच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी

नाशिक । मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवेच्या पूर्वसंध्येला नाशिककरांनी सोमवारी (दि.८) पाडव्यासाठी मनमुराद खरेदी केली. नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये सर्वत्र उत्साही वातावरण दिसून आले.

शहरात जीवनात नवचैतन्य घेऊन येणारा गुढीपाडवा मंगळवारी (दि.९) साजरा करण्यात येणार आहे. या सणासाठी बाजारपेठ सजली आहे. गुढी ऊभारण्यासाठी आवश्यक वेळूच्या काठ्या, विविधरंगी रेशमी वस्त्रे, साखरेच्या हारकडे विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. रविवार कारंजा, मेनरोड, सराफ बाजार आदी परिसरात या साहित्याची दुकाने थाटली आहेत. नाशिककरांनी सोमवारी सहकुटूंब या साहित्याची खरेदी केली. शहरातील पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिकरोड तसेच इंदिरानगर आदी भागांमध्येही गुढीपाडव्याच्या खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला.

- Advertisement -

असे आहेत दर

गुढी उभारण्यासाठी आवश्यक असलेली वेळूची काठीचे दर ५० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. रेशमी वस्त्रांसाठी १०० ते ५०० रुपये मीटर दर आहेत. हारकड्यांचे दर ५० ते १२० रूपयांपर्यंत आहे. चिमुकल्यांपासून अबालवृद्धांपर्यंत सणाचे साहित्य खरेदी करताना दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -