घरमहाराष्ट्रनाशिकपरताव्याच्या आमिषाने गुंतवणुकदारांना पावणेदोन कोटींचा गंडा

परताव्याच्या आमिषाने गुंतवणुकदारांना पावणेदोन कोटींचा गंडा

Subscribe

डीटी मार्केटींगच्या सहाजणांवर गुन्हा दाखल

गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष शहरातील अनेक गुंतवणुकदारांना डीटी मार्केटींग कंपनीने दाखवले. गुंतवणुकदारांनी कंपनीवर विश्वास ठेवत अनेकांनी १ कोटी ८६ लाख रूपये भरले. मात्र, कंपनीने त्यांनाच १ कोटी ८६ लाखांना गंडा घातला. ही घटना सिडकोतील स्टेट बँक चौकात घडली. याप्रकरणी सुरेंद्र मोहरसिंग मोहबिया (३०, रा.जेलरोड) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

डीटी मार्केटींग मुख्य व्यवस्थापक, संचालक संजय रघुनाथ दुसाने, मीरा संजय दुसाने, प्रवीण रघुनाथ दुसाने, रेखा रघुनाथ दुसाने, मनोज शांताराम पवार, गणेशव वडनेरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

सुरेंद्र मोहबिया यांनी ओळखीच्या व्यक्तीच्या सहाय्याने डीटी मार्केटींगमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळत असल्याने ऑनलाईन खाते उघडले व ऑनलाईन गुंतवणूक केली. सुरेंद्र मोहबिया यांनी संजय दुसाने, गणेश वडनेरे व मनोज पवार यांच्यावर विश्वास ठेवत गुंतवणूकीस सुरुवात केली. २५ मार्च २०१८ ते २ फेब्रुवारी २०१९ दरम्यान मोहबियांसह अनेकांनी मार्केटींग कंपनीमध्ये १ कोटी ८६ लाख ३७ हजार रूपये ऑनलाईन व रोखीच्या स्वरूपात जमा केले. गुंतवणुकीचा कालावधी संपल्यावर गुंतवणूकदारांनी संजय रघुनाथ दुसानेंकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी गुंतवणुकदारांना परतावा केला नाही. त्यातून फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -