घरमहाराष्ट्रनाशिकनिओ मेट्रो ओझर विमानतळाशी कनेक्ट करण्याची मागणी

निओ मेट्रो ओझर विमानतळाशी कनेक्ट करण्याची मागणी

Subscribe

बांधकाम व्यावसायिकांची संघटना नरेडकोनी सूचवला महत्त्वपूर्ण पर्याय

नाशिक : देशातील पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो सेवा नाशिकमध्ये सुरू करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केेंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून प्रकल्पाच्या मंजूरीनंतर तीन वर्षात मेट्रो धावणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतीच नाशिकमध्ये केली. या निर्णयाचे बांधकाम व्यावसायिकांनी स्वागत केले असून मेट्रोचा विस्तार ओझर विमानतळापर्यंत करण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या नरेडकोने केली आहे .नाशिकचा विकास झपाटयाने होत आहे. नाशिकमधून जाणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड मार्ग तसेच नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठीही लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याने नाशिकच्या दळवळणाला मोठी चालना मिळणार आहे.

 देशातील पहिली टायरबेस मेट्रो नाशिकमध्ये धावणार असून याकरीता प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. मेट्रो मार्गाकरीता सर्वेक्षण व इतर कामे स्थानिक व उच्च पातळीवर सुरु आहे. या प्रकल्पाने नाशिकच्या विकासाला वेग व नवीन कोंदण लाभणार आहे. मेट्रो निओ नाशिकरिता तीन मार्गाचे नियोजन असून यात गंगापूर गाव ते मुंबई नाका, गंगापूर गाव ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि नाशिकरोड नांदुरनाका मार्गे शिवाजीनगर असा आखण्यात आलेला आहे. यात प्रस्तावित तिसरी मार्गिका नांदुरनाका हा पंचवटी विभागात असून येथून ओझर विमानतळ हे १०-१२ किलोमीटर अंतरावर आहे.

- Advertisement -

या मार्गाचा यात समावेश झाल्यास विमान प्रवासी यांना आणखी एक स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ही मार्गिका ओझर विमानतळापर्यंत प्रस्तावित करावी, अशी मागणी नरेडकोने केली असून याबाबतचे निवेदन खासदार हेमंत गोडसे यांना देण्यात आले.प्रॉपर्टी कार्ड, सातबारातील त्रुटी दूर कराव्यात.गेल्या आठवड्यात राज्य शासनाने काही विभागात सात बारा उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे. यामध्ये नाशिक, सांगली, मिरज आणि पुण्यातील काही विभागांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागाकडून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. डीएलआर व सिटी सर्वे ऑफिसच्या प्रॉपर्टी कार्ड व सात बारा उतारा यात अत्यंत तफावत येत आहे.

प्रॉपर्टी कार्ड, सातबारातील त्रुटी दूर कराव्यात 

गेल्या आठवड्यात राज्य शासनाने काही विभागात सात बारा उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे. यामध्ये नाशिक, सांगली, मिरज आणि पुण्यातील काही विभागांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागाकडून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. डीएलआर व सिटी सर्वे ऑफिसच्या प्रॉपर्टी कार्ड व सात बारा उतारा यात अत्यंत तफावत येत आहे. प्रॉपर्टी कार्ड व सात बारा उतारा यावरील क्षेत्र यातील मोजमाप चुकीचे येत आहे. दुरुस्ती करिता अपील दाखल करावे लागते. आपल्या स्तरावरून याविषयी तात्काळ दखल देऊन राज्य शासनाकडे याविषयी पाठपुरावा करण्याची मागणीही या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -