घरताज्या घडामोडीAmitabh Bachchan यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे HCचे पालिकेला...

Amitabh Bachchan यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे HCचे पालिकेला निर्देश

Subscribe

Amitabh Bachchan Pratiksha Bungalow : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या विलेपार्ले येथील प्रतिक्षा बंगल्याच्या भिंतीचा वाद मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे. प्रतिक्षा बंगल्याचा काही काही भाग रस्ता रुंदीकरणाच्या भागात अडथळा ठरत अल्याने पालिकेकडून बिंग बींना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या नोटीसीला तूर्तास स्थगिती दिली असून तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने पालिकेला दिले आहेत.

बिग बींच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगला येथे असलेला संत ज्ञानेश्वर महाराज रस्ता अरुंद असल्याने या परिसरात संध्याकाळच्या वेळेत ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे पालिकेने इथले रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला. २०१७मध्ये पालिकेने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर तिथल्या अनेक लोकांनी आपली जागा पालिकेच्या स्वाधीन केली. यात बिग बींच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याची भिंत देखील येत असून ही भिंत रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडसर ठरत आहे. बंगल्याची भिंत तोडण्यासाठी पालिकेने एप्रिल २०१७मध्ये दोन नोटीसा बजावल्या होत्या.

- Advertisement -

पोलिकेने नोटीस बजावल्यानंतर नोटींसाविरोधात बिग बी आणि जया बच्चन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी हायकोर्टाने बिग बींच्या प्रतिक्षा बंगल्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे बिग बींना नोटीस बजावून अद्याप कारवाई का झाली नाही याचे निवेदनही येत्या दोन आठवड्यात मागितले आहे. त्यानंतर पालिकेने सहा आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा आणि त्यानंतर तीन आठवडे कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज भासल्यास बिग बींच्या वकिलाची बाजू ऐकून घ्यावी असे देखील हायकोर्टाने म्हटले आहे.


हेही वाचा – Go Air च्या उद्धट एयर होस्टेसवर संतापली अभिनेत्री चित्रांगदा, म्हणाली यांना…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -