घरताज्या घडामोडीनाशिक महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा फडकणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा

नाशिक महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा फडकणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा

Subscribe

नाशिक महानगरपालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा फडकणार असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. नाशिक भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमधील कार्यकर्तांना काम करण्याचे आवाहन केल आहे. तसेच तिकीटासाठी नाही तर पक्षासाठी काम करा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीसांनी दत्तक घेण्याच्या वक्तव्यावरुन विरोधकांवर निशाणा साधत दत्तक घेणे म्हणजे दलाली खायची असा अर्थ नाही असे म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकमधील भाजपा कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपचा भगवा नाशिक महानगरपालिकेवर फडकेल असा दावा त्यांनी केला आहे. तसेच भगवा छत्रपतींचा आहे. परंतु तो भगवा सुरक्षित ठेवण्याचा जबाबदारी केवळ आणि केवळ भाजपवर आली असल्याचे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

दत्तक घेणे म्हणजे दलाली खाणं नव्हे

नाशिकमध्ये भाजपला जनतेनं मोठा आशीर्वाद दिला आहे. त्यावेळी सांगितले होते की, आपण आशीर्वाद द्या नाशिक शहर दत्तक घेईल काही लोकांचा असा गैरसमज झाला की, महानगरपालिका रोज चालवायची आणि त्यातून दलाली खायची कारण पूर्वी अनेक लोकं असे करत होते परंतु आमच्याकडे दत्तक घेण्याचा अर्थ असा नाही आहे. आमच्याकडे दत्तकचा अर्थ असा आहे की महानगरपालिकेचे अधिकारी महानगरपालिका चालवतील जिथे अडचणी येतील त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि ज्या काही योजना असतील त्या आम्ही नाशिकमध्ये आणू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रोजगार वाढवण्याचा प्रयत्न

नाशिकमध्ये रोजगार मिळू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभारत आहोत. ज्या प्रकारे कोविडच्या काळात नाशिकवर अन्या होताना पाहिला आहे. इतर शहरात सरकारने कोविड सेंटर काढले, पुण्यात काढले पण नाशिकमध्ये महानगरपालिकेने जबाबदारी स्वीकारली आणि अतिशय कमी वेळात रुग्णालय सुरु केलं, राज्य सरकारने काही मदत केली नाही. शेवटी ऑक्सिजनची कमतरता होती. ते शेवटी आम्ही आल्यावर ऑक्सिजन दिले. नाशिकमधील नागरिकांना ऑक्सिजनविना मरायला सोडू नका अशा मागणीसाठी आंदोलन केले त्यामुळे ऑक्सिजन दिले अन्यथा ते मिळाले नाही. या काळात संघर्ष करणारे भाजपचे नेते कार्यकर्ते होते आणि त्यांनी नाशिककरांना न्याय दिला असे फडणवीस म्हणाले आहेत.

- Advertisement -

मुंबईच्यापुढे महाराष्ट्र अस्तित्वात आहे

महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजचत नाही आहे. कारण महाराष्ट्रात सरकारचे अस्तित्व दिसत नाही. मुंबईच्या पलिकडे महाराष्ट्र अस्तित्वात आहे याची त्यांना कल्पना नाही. असा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. प्रचंड भ्रष्टाचार अनाचार दुराचार अशा अवस्थेमध्ये राज्य अक्षरशा होरपळते आहे. यामुळे महापालिका निवडणुकीमधअये आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकदीने उतरायला लागेल. हे तिघे काहीही बोले तरी एकत्रित लढतील एकमेकांना मदत करुन लढतील. यांना स्वार्थ आहे कारण त्यांना माहिती आहे की भाजपला एकटं लढवून पराभूत करता येणार नाही त्यामुळे सोबतच लढलं पाहिजे.


हेही वाचा : नारायण राणेंचे राहते घर तोडण्यासाठी बाळासाहेबांचाच मुलगा प्रयत्नशील, नितेश राणेंचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -