घरमहाराष्ट्रनाशिकआश्रमशाळा तपासणी अहवालाबाबत जिल्हा प्रशासन संतप्त

आश्रमशाळा तपासणी अहवालाबाबत जिल्हा प्रशासन संतप्त

Subscribe

नाशिक : अंजेनेरी येथील आधारतीर्थ आश्रमात चार वर्षी बालकाची झालेली हत्या पाठोपाठ हिरावाडीतील आधाराश्रमातील बालिकेवर झालेला अत्याचाराची घटना या घटनेने खळबळ उडाली असून महिला व बालकल्याण विभाग तसेच पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. मात्र सदरच्या अहवालावर प्रशासनाने ताशेरे ओढले असून हा अहवाल त्रोटक असून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे यांनी दिले आहेत.

नाशिक- त्र्यंबक रस्त्यावरील आधारतीर्थ आधार आश्रमातील चार वर्षीय मुलाच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता म्हसरुळ शिवार, मानेनगर येथील आधार आश्रमात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील ३०हुन अधिक मुली वास्तव्यास आहेत. याच निवासी वसतिगृहामध्ये राहणार्‍या शाळकरी मुलीवर संचालकाने अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. मुलीच्या फिर्यादीवरून म्हसरुळ पोलीस स्टेशनमध्ये मध्यरातील गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयताच्या मुसक्या आवळण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान महिला व बालकल्याण विभाग आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी जाउन तपासणी करत अहवाल तयार केला. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरीजवळील आधारतीर्थ आश्रमात बालकांच्या झालेल्य हत्येप्रकरणीही पोलीसांनी अहवाल सादर केला आहे. मात्र या दोन्ही घटनांमध्ये अतिशय त्रोटक अहवाल सादर करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने तपास यंत्रणांवर तोशेर ओढले आहेत. आधारतीर्थ आश्रमातील घडलेला प्रकार आणि मुलीच्या अत्याचाराच्या घटनेत दिलेली कारणे बघता कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पोलीसांनी या घटनांमध्ये दिलेली कारणे बघता अजूनही या प्रकरणात काय कारण आहेत का? या गुन्ह्यामध्ये इतर कोणाचा समावेश आहे का? ते बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत जर अशी गुन्हेगारी कृत्ये आधार आश्रमात होत असतील. एवढ्या लहान मुलांमध्ये जर अशा वृत्ती बळावत असतील तर आधारतीर्थ आश्रमात नेमके कोणते शिक्षण आणि संस्कार मुलांवर केले जातात? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

जिल्हाधिकारी पाहणी करण्याची शक्यता

आधारतीर्थ खूनप्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, तपास यंत्रणेला सोमवारपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. हे सुटीवर असून, सोमवारी ते आल्यानंतर त्यांच्यासमोर हा अहवाल ठेवण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी या ठिकाणी स्वतः भेट देउन अहवालात नमूद मुद्द्यांची तपासणी करण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -