घरमहाराष्ट्रनाशिकखडसेंचे वर्चस्व कायम

खडसेंचे वर्चस्व कायम

Subscribe

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी पुन्हा एखादा विजयाचे सोपस्कार पाडले असून त्यांनी विक्रमी मतांनी आपले वर्चस्व पुन्हा एखादा सिध्द केले आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी पुन्हा एखादा विजयाचे सोपस्कार पाडले असून त्यांनी विक्रमी मतांनी आपले वर्चस्व पुन्हा एखादा सिध्द केले आहे.

यंदा भाजपमध्ये खडसे आणि महाजन, असे दोन गट उघडपणे पडले होते. मात्र, केंद्रामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी रावेरची जागा एकदिलाने लढण्याचे आदेश महाजन व खडसे या दोघांनाही वरून दिले. यामुळे पाडापाडीचे राजकारण न झाल्याने, ही बाब रक्षा खडसे यांच्या दृष्टीने दिलासादायक ठरली. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्यांनी भाजप, विशेषत: खडसेंना मदत केल्यामुळे विजयाचे गणित यशस्वी ठरले. रावेरमधील सहाही आमदार भाजप-शिवसेना युतीचे आहेत. काँग्रेसचे या भागात एकेकाळी असलेले वर्चस्व आज पूर्णतः लयास गेल्याचे पराभावामुळे शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेस काही भागापुरती मर्यादित झाली आहे. स्वतः एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरचे तर त्यांचे भाजपांतर्गत विरोधक राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जमनेरचे आमदार आहेत. रक्षा यांना पुन्हा खासदार करण्यासाठी एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार उच्चशिक्षित असल्याने वैयक्तिक टिका टिप्पणीपेक्षा केलेल्या विकासकामांवर प्रचारात भर देण्यात आला.

- Advertisement -

मतदारसंघात लेवा पाटील समाजाचे वर्चस्व आहे तसेच मराठा व मुस्लिम, दलित मतदारही निर्णायक आहेत. गुजरांची मुलगी आणि लेवा पाटलांची सुन, अशी ओळख असलेल्या रक्षा खडसे यांचा लेवा आणि गुजर या दोन्ही मतदारांवर प्रभाव आहे. तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा विविध शैक्षणिक संस्था आणि वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क आहे. परंतु, पराभवामुळे संपर्काचा फारसा फायदा झाला नसल्याचे दिसून आले आहे. भोर पंचायतच्या अधिवेशनादरम्यान डॉ. पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर लेवा समाजाची नाराजी भोवल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे भोर पंचायतीची भुमिकाही निर्णायक ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली. तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती. काँग्रेस कार्यकर्ते अभावानेच प्रचारात दिसून आले, याचा फटकाही काँग्रेसला बसल्याचे बोलले जात आहेत. या पराभावामुळे काँग्रेसच्या अस्तिव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रचारादरम्यान शेतकर्‍यांना हमी भाव, रेल्वे विभागातील कर्मचार्‍यांचे प्रश्न, बेरोजगारी, केळीला मिळणारा भाव, हे मुद्दे निवडणुकीत महत्वाचे ठरले. रावेरकरांनी रक्षा खडसे यांनी विक्रमी कौल देऊन भाजपचे हात बळकट केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -