घरताज्या घडामोडीकरोनाच्या संकटामुळे मालेगावात ईद साधेपणानेच

करोनाच्या संकटामुळे मालेगावात ईद साधेपणानेच

Subscribe

ईदगाह मैदानावर सामुहीक नजाम अदा करण्याची पंरपरा खंडीत

यंदाच्यावर्षी करोनाच्या संकटामुळे रमजान ईद सण साधेपणाने साजरा करण्यात आला. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सर्वच धार्मिक कार्यक्रम तसेच सणवार एकत्रित साजरे करू नये असे आवाहन केले. शासनाच्या या आवाहनानूसार नाशिक जिल्हयात ईद साधेपणानेच साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरीच नमाज अदा केली. तसेच आप्तेष्ठ, नातेवाईकांना फोनव्दारे शुभेच्छा दिल्या.

मालेगांवमध्येही दरवर्षी ईदगाह मैदानावर होणारी सामुहीक नमाजाची परंपरा खंडीत झाली. मैदानावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली होता. तसेच या मार्गावर नागरीकांना येण्या जाण्यास बंदी करण्यात आली होती. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान महीन्यात उत्सवाचे वातावरण असते. यावर्षी मात्र करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे यंदा रमाजन सणावरही करोनाचे सावट दिसून आले. यंदा ईदसाठी लागणार्‍या साहीत्य खरेदीसाठीही गर्दी दिसून आली नाही. मालेगावात तर ईदच्या दिवशी उत्साहाचे वातावरण असते मात्र आज मालेगावात संचारबंदी लागू असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. संचारबदींच्या पार्श्वभुमीवर मुस्लिम समाजबांधवांनी घरातच नमाज अदा केली. मालेगावांतील बहुसंख्य लोक हे पॉवरलूममध्ये काम करतात. मागील दोन महीन्यांपासून पॉवरलूम बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळेच ईद साधेपणाने साजरी करण्याची वेळ आली आहे. आजघडीला गाव मोहल्ले बंद आहेत. प्रत्येक जण घरी थांबलेले आहेत. तर अनेकजण क्वारंटाइन आहेत. करोनाच्या भीतीमुळे नाते दुरावले आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शारिरिक अंतर ठेवणे आवश्यक असल्याने ईद निमित्त शुभेच्छा देतांना गळाभेटही घेता आली नाही. तर शिरर्खुम्याचा आस्वाद घेण्यासाठी कुणाच्या घरीही जाता आली नाही. त्यामुळे यंदा ईदची रौनक फिकी दिसून आली.

- Advertisement -

जिल्हाधिकार्‍यांनी मानले आभार
रमजान सारख्या पवित्र महिन्यातच कोरोनासारख्या महामारीचे संकट शहरावर घोंगावत असतांना त्याचा मुकाबला करण्यासाठी शासन प्रशासनासोबत सर्व नागरिकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. या महिन्यामध्ये सर्व नागरिकांनी रमजानचे रोजे ठेवत घरातच नमाज अदा करुन एक चांगला आदर्श घालून दिला आहे. नागरिकांच्या संयमी भूमिका व स्वत:सोबत समाजाची घेण्यात आलेली काळजी यामुळेच आज मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या घटतांना दिसत आहे. अशाच प्रकारे यापुढेही नागरिकांचे सहकार्य मिळेल असे आवाहन करीत शहरातील मुस्लिम बांधवांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज ईद निमीत्त शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारयांनी महापौर ताहेरा शेख, आमदार मौलाला मुफती मोहम्मद यांची भेट घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद म्हणाले, शहरातील नागरिक हे आजपर्यंत जकातीचा महिना असल्यामुळे तारले गेले मात्र यापुढे कुणावरही उपासमारीची वेळ येणार नाही यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत अशी मागणी केली. मालेगांवकरांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशासन कटीबध्द असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -