घरमहाराष्ट्रनाशिकतरुणांना लुटणारा तोतया पोलीस गजाआड

तरुणांना लुटणारा तोतया पोलीस गजाआड

Subscribe

तरुणाच्या खिशातील रोकड बळजबरीने काढून घेत संशयित फरार झाला होता.

तोतया पोलीस बनून सार्वजनिक स्वच्छतागृहात तरुणास लुटणार्‍या आरोपीस सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. संशयिताने पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा बहाणा करून तरुणाच्या खिशातील रोकड बळजबरीने घेत फरार झाला होता. ही घटना पंडित कॉलनीत घडली. याप्रकरणी सातपूर येथील व्यावसायिक तरुणाने तक्रार दाखल केली. तोतया पोलीस देवेंद्र लक्ष्मण निकम (रा. चांदवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एक तरुण कामानिमित्त राजीव गांधी भवन परिसरात रात्री १० च्या सुमारास आला. दुचाकी पार्क करून तो सार्वजनिक स्वच्छतागृहात गेला असता, देवेंद्र निकमने त्याचा हात पकडला. मी पोलीस आहे, तू येथे चोरी करतोस काय, असे म्हणून तुला पोलीस ठाण्यात बंद करतो, अशी धमकी दिली. तरुणाने चोर नसल्याचे सांगितले. निकमने त्याला दुचाकीवरून पंडित कॉलनीत फिरवले. त्याच्याकडून ५० हजारांची मागणी केली. त्याला मारहाण करत खिशातील १० हजारांसह पाकिट घेत फरार झाला. तरुणाने आपबिती सरकारवाडा पोलिसांना सांगितली. पोलिसांनी शोध घेत निकमला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -