घरमहाराष्ट्रनाशिककर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Subscribe

घराजवळील पालखेड डावा कालवामध्ये उडी मारून संपवली जीवनयात्रा

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. दत्तात्रय देवराम पाटील असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. पाटील शनिवारपासून घरातून बेपत्ता होते. सहा दिवसांपासून पाटील बेपत्ता असल्याने त्यांचे कुटुंब भयभीत झाले होते.

पाटील यांच्या कुटुंबियांनी वणी पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास पालखेड डावा कालव्याच्या पाण्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून आला. परंतु, मृतदेह पाण्यात असल्याने ओळख पटत नव्हती. अथक प्रयत्नानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

- Advertisement -

चिंचखेड येथील दत्तात्रय देवराम पाटील यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. पाटील यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे 25 लाखांचे कर्ज होते. त्यांना काही दिवसांपूर्वी बँकेतून फोन येत होते, यामुळे एक ते दोन महिन्यांपासून आजारी होते. परंतु, सतत नापिकी आणि वाढणारा कर्जाचा डोंगर, यामुळे कर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी नैराश्यातून घराजवळील पालखेड डावा कालवामध्ये उडी मारून जीवनयात्रा संपवली. वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -