घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअखेर चांदवड तालुक्यातील 'तो' जलजीवनचा ठेका रद्द

अखेर चांदवड तालुक्यातील ‘तो’ जलजीवनचा ठेका रद्द

Subscribe

नाशिक : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये काही तालुक्यात त्रुटी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या कामांची गती वाढविण्यासाठी व तक्रारी दूर करण्यासाठी चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे व कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.२३) चांदवड व देवळा तालुक्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यात एका ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय पथकाने घेतला. यासोबतच वाढीव कामांसाठी सुधारीत अंदाजपत्रके पाठविण्याच्या सूचना देखील अभियंत्यांना देण्यात आल्या.

जल जीवन मिशन योजनेची कामे घाईने पुर्ण करण्याच्या प्रयत्नात ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सबंधित अधिकार्‍यांना जल जीवन मिशनच्या कामांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी (दि.२३) जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्यासह देवळा व चांदवड तालुक्याचा पदभार असलेले उपअभियंता रवींद्र महाजन यांनी चांदवड व देवळा तालुक्यात सुरू असलेल्या कामांना भेट देऊन पाहणी केली. वेळेत काम चालु केले नसल्याचे निदर्शनास आल्याने ठेकेदाराचे काम बंद करण्याचा निर्णय पथकाने घेतला.

- Advertisement -

गुणवत्तेबाबत ठेकेदारांना दिल्या सूचना
पाहणी दौर्‍यात सर्वच मक्तेदारांना गुणवत्ता राखण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे ज्या ठिकाणी वाढीव कामांची गरज आहे, तेथे सुधारीत अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. : संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, जि.प.नाशिक

या कामांची पाहणी

दौर्‍यात चांदवड तालुक्यातील सोग्रस, शिवरे, धोडांबे, कानमंडळे, वाकी बुद्रुक, खडकजाम येथील कामांना तर देवळा तालुक्यातील खडकतळे व भऊर येथे सुरू असलेल्या कामांची पथकाने पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -