घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविचित्र अपघात : ट्रकमध्ये उतरला वीजप्रवाह, नंतर फुटले टायर; ट्रकचालकासह हमालाचा दुर्दैवी...

विचित्र अपघात : ट्रकमध्ये उतरला वीजप्रवाह, नंतर फुटले टायर; ट्रकचालकासह हमालाचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

नाशिक : शेणखताची वाहतूक करणार्‍या मालट्रकच्या पाठीमागील बॉडीला वीजप्रवाह सुरू असलेल्या तारेचा धक्का लागल्याने चालकासह हमालाचा मृत्यू झाल्याची घटना निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे गुरुवारी (दि. १६) सकाळी घडली. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबई येथील पारसनाथ गणपत पाल मालट्रकमधून (एमएच १५ बीजे ७४८३) शेणखत घेवून पिंपळगाव बसवंतमार्गे दावचवाडी गावात आले.

तेथून शेणखत खाली करणारे हमाल पप्पू सोमनाथ यादव व विजय प्रल्हाद शिंदे यांना गाडीमध्ये बसवून पालखेड शिवारातील शेतकरी बाळासाहेब नाना आहेर यांच्या शेतात दावचवाडी – पालखेड शिव रस्त्याने जात होते.याठिकाणी लोंबकळलेल्या वीजवाहक तारेचा ट्रकला धक्का लागला. त्यामुळे ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला. त्यानंतर क्लिनर बाजूचे पाठीमागील टायर फुटले आणि चालक व हमाल बाहेर फेकले गेले. यात चालक आणि हमाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.तर हमाल पप्पू सोमनाथ यादव याने गाडीतून उडी मारली. तोपर्यंत वीजप्रवाह बंद झाल्याने तो वाचला.

- Advertisement -

मृतांमध्ये ट्रकमालक पारसनाथ गणपत पाल (वय ६३, रा. घर नं. ६३०, शिवशक्ती नगर, ठाणे, बेलापूर रोड, तुर्भे स्टोर, नवी मुंबई, तुर्भे, ठाणे) व हमाल विजय प्रल्हाद शिंदे (वय ३९, मुळ रा. सोनुन, ता. चोंढी, जि. अकोला, ह. मु. दावचवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) या दोघांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे तपास करत आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -