घरताज्या घडामोडीपंचवटीत सिलिंडर स्फोटाचा थरार

पंचवटीत सिलिंडर स्फोटाचा थरार

Subscribe

मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील घटना, सुदैवाने जिवीतहानी टळली

मेरी-रासबिहारी लिंकरोड भागातील माने नगरात घरगुती गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटाचा थरार स्थानिक नागरिकांनी अनुभवला. सुदैवाने या घटनेत कोणतिही प्राणहानी झाली नाही. मात्र, संपूर्ण घर जळून खाक झालं.

विठ्ठल बोरकर यांच्या घरात झालेल्या या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की, या स्फोटामुळे शेजारील घराचंही मोठं नुकसान झालं. पत्र्याच्या शेडच्या घरात ही गॅस गळती होऊन आग लागली. त्यात घरातील सर्व संसाराचा अक्षरशः कोळसा झाला. बोरकर यांचा टेलरिंगचा व्यवसाय असून, ते या घरात सहकुटुंब राहत होते. सुदैवाने ते बाहेर असल्याने या अपघातातून ते थोडक्यात बचावले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -