घरमहाराष्ट्रनाशिकअवघ्या १५ मिनिटात लिव्हर पोहोचले रुग्णालयात

अवघ्या १५ मिनिटात लिव्हर पोहोचले रुग्णालयात

Subscribe

१५ मिनिटांत सिक्स सिग्मा हॉस्पिटल ते अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल ग्रीन कॉरिडोरने यकृत पोहोचले.

ब्रेन डेड झालेल्या रुग्णाचा अवयवदानाचा निर्णय डॉक्तर, नातेवाईकांनी घेतला आणि वैद्यकीय पथकासह पोलीस यंत्रणा कामाला लागली. बुधवारी (दि.१) सायंकाळी अवघ्या १५ मिनिटांत सिक्स सिग्मा हॉस्पिटल ते अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल ग्रीन कॉरिडोरने यकृत पोहोचले.
सिक्स सिग्मा हॉस्पिटल येथे ब्रेन डेड रुग्णाच्या अवयवदान करण्याचे निश्चित झाले. यकृत बुधवारी (दि.१) संध्याकाळी ७:३३ निघून लगेच ७:४८ ला अशोका मेदिकोवर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यामुळे अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे झेडटीसीसीच्या नोंदीनुसार एका रुग्णाला यकृत मिळाले. त्यानंतर अशोका मेडिकव्हरच्या डॉक्टरांचा टीमने यकृत प्रत्यारोपण केले. डॉ. तुषार संकलेचा, डॉ. जी. बी. सिंघ यांच्या देखरेखखाली डॉक्टांराची टीम काम केलेे. अमोल दुगजे यांनी ऑर्गन ट्रान्सप्लांट समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. या रुग्णालयात डॉ. सुशील पारख, सचिन बोरसे, रितेश कुमार, डॉ. सागर पालवे यांच्या प्रयत्नांतून दर्जेदार सुविधा देण्यात येत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -