घरमहाराष्ट्रनाशिकएचएएल कामगार संघटना त्रैवार्षिक निवडणुकीत जागृती पॅनलचा डंका

एचएएल कामगार संघटना त्रैवार्षिक निवडणुकीत जागृती पॅनलचा डंका

Subscribe

सरचिटणीसपदी संजय कुटे तर अध्यक्षपदी अनिल मंडलिक विजयी

ओझर : येथील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी 24 जून रोजी मतदान झाले. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या एचएएल कामगार संघटनेची निवडणूक यंदा तीन पॅनलमध्ये रंगली. श्री समर्थ शक्ती पॅनल, श्री आपला जागृती पॅनल व श्री विश्वास पॅनलमध्ये तिरंगी लढती बरोबरच ३ अपक्ष उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतून बंद झाले होते.

संघटनेच्या ३१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपद १ जागा, उपाध्यक्ष ४, सरचिटणीस १, सहचिटणीस ४, खजिनदार १ व कार्यकारिणी सदस्यपद २० जागांचा समावेश आहे. एकूण ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.3143 कामगारांपैकी 2893 कामगारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिली मतमोजणी अध्यक्षपदाची झाली. त्यात श्री आपला जागृती पॅनलचे अनिल मंडलिक सर्वाधिक 1445 मते मिळवून विजयी झाले तर श्री समर्थशक्ती पॅनलचे जितेंद्र जाधव (442 मते), पवन आहेर (988 मते) मिळाली.

- Advertisement -

त्यानंतर खजिनदार पदासाठी श्री आपला जागृती पॅनलचे प्रशांत आहेर (1565 मते) सर्वाधिक मतदान घेत विजयी झाले तर अमोल जोशी (510 मते), सुधीर राजगुरु यांना (680 मते) मिळाली. तर श्री आपला जागृती पॅनलचे सरचिटणीसपदासाठी संजय कुटे (1654 मते) मिळवून विजयी झाले तर श्री समर्थशक्ती गटाचे सचिन ढोमसे (1032 मते),श्री विश्वास पॅनलचे गिरीश वळवे (191 मते) हे चुरशीच्या लढाईमध्ये पराभूत झाले. श्री आपला जागृती पॅनलचे संजय कुटे व अध्यक्षपदासाठी अनिल मंडलिक यांचा विजय झाल्याने समर्थशक्ती सचिन ढोमसे यांचा पराभव झाला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -