घरताज्या घडामोडीदिंडोरीत अवैध मद्यसाठा जप्त

दिंडोरीत अवैध मद्यसाठा जप्त

Subscribe

दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारातील आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या हॉटेल बैठकवर पोलिसांनी बुधवारी (दि.25) रात्री छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी कैलास घोलप पळून गेेला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन असताना पेठ व दिंडोरी तालुक्यातील अवैध व्यावसायिक खुलेआम बेकायदेशीररित्या मद्य विक्री करत असल्याची पोलिसांना मिळाली. पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे व दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांच्या पथकाने छापा टाकला. छाप्यात देशी दारू प्रिन्स संत्रा कंपनीच्या 48 सीलबंद दारूच्या बाटल्या, प्रत्येकी 180 मिली मापाच्या प्रत्येकी 52 रुपये किमतीच्या एकूण 2 हजार 496  रुपयांच्या व टयू बर्ग प्रेमियम कंपनीच्या बियरने भरलेल्या 13 बाटल्या 750 मि. ली. मापाच्या सीलबंद बाटल्या प्रत्येकी रुपये 165 रुपये किमतीच्या 2 हजार 145 रुपयांच्या असा एकूण 4 हजार 641 रुपयाचा अवैध मद्यसाठा जप्त केला. संशयित आरोपी कैलास घोलप हा दारू विक्री करीत होता. त्यास छाप्याची चाहूल लागताच मद्यसाठा सोडून तो पळून गेला. पोलीस कर्मचारी हेमंत केदा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बादली दंड संहिता 65( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी अरुण आव्हाड यांच्या पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, शंकर जाधव, दिलीप पगार, आदी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -