Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक कांदा निर्यातबंदी त्वरित हटवा

कांदा निर्यातबंदी त्वरित हटवा

निफाड तालुका मनसेचे तहसीलदारांना निवेदन

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निफाड तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना कांदा निर्यातबंदी तात्कालिक हटवण्याबाबत निवेदन देण्यात आले.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा उत्पादक असून उच्च प्रतीचे तसेच निर्यातीसाठी दर्जेदार कांदा पीक घेतले जाते. येथील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून असते. सध्या भरपूर प्रमाणात कांदा शेतकऱ्यांनजवळ पडून आहे. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा हा आंतरराष्ट्रीय सीमेवर अडकून पडला आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा खुली करावी. कांद्याच्या किंमतीत खूप वाढ झालेली नसून अजूनही सर्व सामान्य जनतेच्या आवाक्यात असल्याने ताततीने निर्यातबंदी उडविणे गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या  संकटातून शेतकरी, व्यापारी आणि वाहतुकदार आता कुठे सावरत असताना केलेली निर्यातबंदी घटक आहे. त्यामुळे ही बंदी तातडीने उठवण्यात यावी, असे निवेदनात नमूद आहे.

- Advertisement -

याप्रसंगी प्रकाश गोसावी, निफाड तालुकाध्यक्ष शैलेश शेलार, विधानसभा अध्यक्ष सुयोग गायकवाड, सरचिटणीस अब्दुल शेख, मनविसे तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, गिरीश कसबे, नवनाथ घोलप, सद्दाम, धनंजय साळुंके आदि प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

धरणे आंदोलनाचा इशारा

निर्यातबंदी लवकरात लवकर उठवण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना निफाड तालुका यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -