कहरच! जिल्ह्यात दिवसभरात आढळले ११०३ कोरोनाबाधित

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १४ टक्क्यांवर

corona Virus third wave Health Secretary pradip vyas warn 2 lakh corona patient report in january

नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाची संख्या अतिशय झपाट्याने वाढत असून, जिल्हा रुग्णालयाकडून शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात ११०३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांतील ही वाढ अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेतीन हजारांवर पोहोचली आहे.

शनिवारी प्राप्त अहवालानुसार नाशिक महापालिका हद्दीत ८५७, नाशिक ग्रामीण हद्दीत २०१, मालेगाव महापालिका क्षेत्रात ६ तर जिल्हा बाहय ३९ रूग्ण आढळून आले आहेत. तर ११९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणता येईल. परंतु कोरोना वाढीचा वेग पाहता ही परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्हयात आजपर्यंत ४ लाख १७ हजार ७४१ कोरोना बाधित आढळून आले त्यापैकी ४ लााख ५ हजार ४२८ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ८ हहजार ७६३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयाचा पॉझिटिव्हीटी दरही १३.८३ टक्क्यांवर जाउन पोहचला आहे.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.01 टक्के, नाशिक शहरात 97.45 टक्के, मालेगावमध्ये 97.01 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 96.61 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार 250 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 29, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कठोर कारवाईस भाग पाडू नका

ज्या नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे. तो वेळेत घ्यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे गेल्या आठ दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या पाहता लग्नसमारंभ साधेपणाने करावे. नागरिकांनी लसीकरण वेळेत करून घ्यावे.वअन्यथा वेळेत लसीकरण न झाल्यास ‘नो व्हॅक्सिनेशन, नो रेशन’ असा कटू निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.