घरताज्या घडामोडी३३ वैमानिक देशसेवेत, कॅटसच्या ३४ व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत सोहळा

३३ वैमानिक देशसेवेत, कॅटसच्या ३४ व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत सोहळा

Subscribe

नाशिक । भारतीय सेनेतील हेलिकॉप्टर पायलटना प्रशिक्षण देणार्‍या गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा ३४ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा मंगळवारी सकाळी पार पडला. या तुकडीतील ३३ वैमानिक देशसेवेत दाखल झाले. या वैमानिकांचा एव्हीएशन विंग प्रदान करण्यात आले.

यंदा कोरोनाच्या सावटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने हा दीक्षांत सोहळा संपन्न झाला. यावेळी आर्मी एव्हीएशनचे ऑफीशिएटींग संचालक मेजर जनरल अजयकुमार सुरी उपस्थित होते. एका खास बग्गीतून सुरी यांचे मैदानावर आगमन झाले. यावेळी त्यांना सॅल्युट करण्यात आला. त्यांच्या हस्ते उपस्थित प्रशिक्षणार्थीं वैमानिकांना प्रशस्तीपत्रक, विंग देऊन तसेच पाच विजेत्यांना विविध स्मृतीचषक प्रदान करत गौरविण्यात आले. यंदा कोरोनाच्या सावटामुळे चिता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरची प्रात्याक्षिके रदद करण्यात आली. युध्दजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालवणे, शत्रुवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे उपचारार्थ तत्काळ हलविणे आदि बाबींचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण सुमारे वर्षभराच्या कालावधीत या केंद्रातून प्रशिक्षणार्थीं जवानांना देण्यात आले. यावेळी

- Advertisement -

युध्दभुमीवरील भुमिका महत्वाची : सुरी
यावेळी सुरी यांनी वैमानिकांचे अभिनंदन करत युध्दभूमीवरील आपली भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. कुठल्याही भौगोलिक परिस्थितीत लढाउ वैमानिक हे आपल्या कौशल्यावर सुरक्षित उडडाण करत सैनिकांना सर्वोतोपरी मदत करतात. ज्ञान आणि कौशल्य हे कुठल्याही ऑपरेशनच्या वेळी वैमानिकासाठी महत्वाचे ठरते. कौशल्याच्या जोरावर तंत्रज्ञानाचा अचूक वापर जेव्हा केला जातो तेव्हा तुम्ही यशाला गवसणी घालतात. भूदलावरील सैनिकाना रसद पुरविण्यापासून आपत्कालीन रेस्क्यूपर्यंत सर्व कामगिरी एका लढाऊ वैमानिकाला चोखपणे पार पाडावी लागते असेही ते म्हणाले.

यांचा झाला सन्मान
प्रशिक्षण कालावधीत सर्व श्रेणीत विशेष प्राविण्य मिळविल्याने कॅप्टन संतोषकुमार सोरापल्ली यांना ‘सिल्वर चिता’ ट्राफी देऊन गौरविण्यात आले. तसेच कॅप्टन तारीफ सिंग हे उत्कृष्ट उडडाणकरिता दिली जाणारी कॅप्टन एस.के.शर्मा स्मृती चषकाचे मानकरी ठरले. कॅप्टन प्रभु देवन यांनी एअर ऑब्जर्वेशन पोस्ट ३५ ट्रॉफी पटकाविली. कॅप्टन सचिन गुलीया यांना फ्लेजिंग ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कॅप्टन दिवाकर ब्रम्हचारी यांनी उत्कृष्ट गनरचा किताब प्राप्त करत पी.के.गौर चषकावर आपले नाव कोरले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -