घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले; वाहतुकीसाठी रस्ता बंद

महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले; वाहतुकीसाठी रस्ता बंद

Subscribe

नाशिक : उड्डाणपुलाखाली पावसामुळे वाहून येणारी माती वाढल्याने वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक उपाययोजना करूनही अपघातसंख्या कमी होत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अखेर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

शहरातून जाणार्‍या उड्डाणपुलाखाली सुशोभिकरणासाठी विविध प्रकारची शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. मात्र, या झाडांची माती पावसाळ्यात रस्त्यावर वाहून येते. त्यातच उड्डाणपूलावरुन कोसळणारे पाणी यामुळे हा रस्ता निसरडा बनत असल्याने या ठिकाणांहून वाहने घसरण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. शुक्रवारी देखील पावसामुळे या मार्गावर वाहने घसरण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलिसांकडून अखेर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वाहने घसरण्याचे प्रकार थांबवण्यासाठी रस्त्यावर जेसीबीच्या मदतीने चरेदेखील मारण्यात आले आहेत. गेल्या पाच दिवसांत चार वेळा हा महामार्ग बंद करण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाच्या कारभारावर वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

रस्त्यावर चिखल होत असल्याने वाहने घसरत आहेत. हे वाढते अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील माती हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महामार्गाला चरे पाडण्यात येत आहेत, जेणेकरून वाहने घसरणार नाहीत. : भाऊसाहेब साळुंखे, प्रकल्प अधिकारी, महामार्ग प्राधिकरण

- Advertisement -

प्रयोग थांबवा, मुख्य उपाययोजनांवर भर द्या

महामार्ग प्राधिकरणासह वाहतूक पोलिसांकडून अपघात रोखण्यासाठी रस्त्यांना चरे पाडण्याचे प्रकार सुरू आहेत. मध्येच रस्ते बंद केले जातात. असे सर्व प्रकार करण्यापेक्षा पुलावरून कोसळणारे पाणी थांबवले पाहिजे. दुभाजकांची उंची वाढवायला हवी, शिवाय नालेसफाई केली पाहीजे, म्हणजे पाण्याचा योग्य निचरा होईल, मातीही वाहून येणार नाही आणि अपघातसंख्या कमी होईल, अशा संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -