घरमहाराष्ट्रनाशिकखासगी अॅम्ब्युलन्सची ‘सिव्हिल’मध्ये घुसखोरी

खासगी अॅम्ब्युलन्सची ‘सिव्हिल’मध्ये घुसखोरी

Subscribe

जिल्हा शासकीय रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा पुढे आला असून खासगी रुग्णवाहिकांनी सिव्हीलच्या जागेवर डल्ला मारल्याची धक्कादायक बाब ‘आपलं महानगर’च्या निदर्शनास आली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा पुढे आला असून खासगी रुग्णवाहिकांनी सिव्हीलच्या जागेवर डल्ला मारल्याची धक्कादायक बाब ‘आपलं महानगर’च्या निदर्शनास आली आहे. शासनाच्या रुग्णवाहिकांना मोठ्या मुश्किलीने पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत असताना खासगी रुग्णवाहिका चालकांच्या दादागिरीने रुग्णांचीही परवड होत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात अनोळखी व्यक्ती राजरोसपणे काम करत असल्याची बाब नुकतीच आपलं महानगरने उघडकीस आणली होती. आता आणखी एक प्रकार पुढे आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात शासकीय वाहने, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी पार्किंगची स्वतंत्र्य व्यवस्था आहे. रुग्णांची भेट झाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून वाहने घेऊन बंधनककारक असून नियम खासगी रुग्णवाहिकांनासुद्धा लागू आहे. खासगी रुग्णवाहिकांनी रुग्ण व नातेवाईकास शासकीय रूग्णालयात सोडल्यानंतर रुग्णवाहिका आवारात घेऊन जाणे बंधनकारक आहे. रुग्णालयाच्या आवारात फक्त शासकीय वाहने व १०८ रुग्णवाहिकांना पार्किंगची परवानगी आहे. मात्र, खासगी रुग्णवाहिकांना पार्किंगची परवानगी नसतानाही बेकायदा पार्किंग केले जात आहे. याप्रकरणी राज्य शासनाने १९ मार्च २००८ ला निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार खासगी व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, संघटना, सेवाभावी संस्था यांना मोकळ्या जागेचा वापर करता येणार नाही, असे निर्णयात म्हटले आहे.

- Advertisement -

शासकीय रुग्णालयात खासगी संस्था, व्यक्तींनी व्यवसायासाठी जागा दिल्यास रुग्णालय परिसरात अस्वच्छता, गर्दी व त्यामुळे जंतुसंसर्ग यामुळे उपचार प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याच्यादृष्टीने व भविष्यात रुग्णालयाच्या विस्तारासाठी लागणारी मोकळ्या जागेची आवश्यकता याबाबींचा विचार करून शासनाने असा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध शासकीय रुग्णालयांच्या परिसरातील मोकळी जाग खासगी संस्था व व्यक्ती यांना कोणत्याही प्रयोजनासाठी वितरीत करू नये, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने खासगी रुग्णवाहिकांकडून शासकीय जागेचा सर्रास वापर केला जात आहे.

खासगी रूग्णवाहिकांमुळे अडथळे

जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात खासगी रग्णवाहिका रात्रीच्या वेळी पार्क केल्या जातात. शासकीय किंवा खासगी रूग्णवाहिका मध्यरात्री मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन येतात. त्यावेळी त्या वाहनांना बेकायदा रग्णवाहिकांच्या पार्किंगमुळे अडथळे येतात. रूग्णवाहिकांना अडथळ्यांची शर्यत पार करून मार्ग काढावा लागतो.

- Advertisement -

खासगी रूग्णवाहिकांना परवानगी नाही

जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात फक्त शासकीय वाहनांना परवानगी आहे. खासगी रूग्णवाहिकांना पार्किंगसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. – डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

रुग्णालय आवारातच धुम्रपान

शासकीय जागेत धुम्रपान करणे कायद्याने बेकायदेशीर आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन कक्षाजवळील एका भिंतीलगत खासगी रूग्णवाहिकेचे चालक व इतर व्यक्ती गांजा ओढत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने भरदिवसा गांजा ओढत आहेत. जिल्हा रुग्णालयाने वेळीच याकडे लक्ष दिले नाही, तर हे धुम्रपानाचे केंद्र बनू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -