घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात गोवरचा शिरकाव; मालेगावात आढळले ४४ रुग्ण

नाशिक जिल्ह्यात गोवरचा शिरकाव; मालेगावात आढळले ४४ रुग्ण

Subscribe

मालेगाव : शहरात गोवर साथीच्या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस मालेगावमध्ये वाढत आहेत. नागरिकांनी ९ महिने ते १८ महिन्यांच्या बालकांना गोवर डोस दिला आहे की नाही याची खात्री करावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. मालेगावात गोवरचे ४४ रुग्ण आढळून आल्याने महानगरपालिका सतर्क झाली आहे.

आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांचे मार्गदर्शनाखाली व आरोग्याधिकारी यांचे अधिपत्यातील आरोग्य विभागात अंतर्गत मनपा संचालित १४ नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसापासून मुंबईमध्ये सुरु असलेली गोवरची साथ ही मालेगाव शहरामध्ये देखील पोहचली आहे. शहरातील लहान मुलांना गोवर होण्याची साथ सुरु झाली आहे. गोवर साथीच्या आजाराने आतापर्यंत ४४ रुग्ण मालेगाव महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी मालेगाव महापालिका प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मालेगाव महापालिका, मालेगाव कार्यक्षेत्रातील विशेष पूर्व भागात असलेल्या अनास्थेमुळे विविध साथरोग सातत्याने उदभवत आहेत व बहुसंख्य रुग्णांनी गोवरची लस न घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात गोवरचे रुग्ण आढळुन आल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, पालकांनी काळजी न करता आपल्या कुंटुबातील ९ महिने ते १८ महिन्यांच्या बालकांना गोवर डोस दिला आहे की, नाही याची खात्री करावी. गोवर लसीकरण दिले नसेल तर जवळील नागरी आरोग्य केंद्रात, व नियमित लसीकरण होणार्‍या मदरसा/अंगणवाडी, खासगी रुग्णालयात गोवर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक मालेगाव महानपालिका, मालेगाव अतिरीक्त आयुक्त, उपायुक्त व आरोग्याधिकार्‍यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -