Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक नाशिकमध्ये जनता कर्फ्यू ही अफवाच!

नाशिकमध्ये जनता कर्फ्यू ही अफवाच!

पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण; शहरासह ग्रामीण भागातील व्यवहार नियमित वेळेनुसारच सुरु राहणार

Related Story

- Advertisement -

कोरोनाची दुसरी लाट आली असून, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आल्याचे मेसेज रविवारी (दि.२२) सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी इतरांशी संपर्क साधत शहानिशी करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात नाशिकमध्ये जनता कर्फ्यू ही अफवाच असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत सांगत शहरासह ग्रामीण भागातील व्यवहार नियमित वेळेनुसारच सुरु राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसह संशयित रुग्णांची वाढू लागली असून, लवकर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात सध्या ४ हजारहून अधिक संशयित कोरोना रुग्ण असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळांकडे पाविण्यात आले आहेत. दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आले. अनेकजण विनामास्क दिसून आले. तसेच, थंड हवामान कोरोनास पोषक असल्याने कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले असून, दिल्ली व अहमदाबादमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच, पुणे व मुंबईत शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आल्याचे मेसेज सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाले. त्यासाठी वृत्तवाहिनीच्या बातमीचा संदर्भही देण्यात आला. प्रत्यक्षात जनता कर्फ्यूबाबत कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. काहीजणांनी जनता कर्फ्यू संदर्भातील जुनी बातमी खोडसाळपणे फॉरवर्ड करत अफवा पसरवली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी एकमेकांशी मोबाईलवर संपर्क साधत शहानिशा करण्याचा प्रयत्नही केल्याचे दिसून आले. जनता कर्फ्यूबाबतची माहिती जिल्हा प्रशासनासह पालकमंत्री छगन भुजबळ यांना समजली असता त्यांनी तत्काळ कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत नाशिक शहरासह ग्रामीण भागातील व्यवहार नियमित वेळेनुसारच सुरु राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

- Advertisement -