घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरातून दोन युवतींसह दोघा बालकांचे अपहरण

नाशिक शहरातून दोन युवतींसह दोघा बालकांचे अपहरण

Subscribe

धोका वाढतोय : विविध पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल, शोध सुरू

नाशिक : शहरात युवतींना फूस लावून पळवून नेण्याचे तसेच लहानग्यांचे अपहरण करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून, गेल्या दोन दिवसांत तीन शहरात वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन मुलींसह दोन बालकांचे अपहरण करण्यात आल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे.

अंबड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या पहिल्या एका घटनेत अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांची मुलगी ही १७ जलैला रात्री शौचास जाऊन येते, असे तिच्या आईला सांगून गेली. मात्र, ती अद्याप घरी परतली नाही. त्यामुळे तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावली आणि पळवून नेत अपहरण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कातकाडे करत आहेत.

- Advertisement -

दुमसर्‍या घटनेत आडगावला अपहरण झालेल्या मुलीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, तिची बारा वर्षांची बहीण आणि दहा वर्षांचा लहान मुलगा हे दोघेही १६ जुलैला सकाळी १० वाजता विंचूर गवळीला गेले. मात्र ते परतलेच नाहीत. त्यांचे कुणीतरी अज्ञाताने अपहरण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोरपडे करत आहेत.

सिन्नर फाटा येथे घडलेल्या तिसर्‍या घटनेत लक्ष्मण मधुकर काकडे (वय ४५, रा. चंद्रपूर, ह.मु. सिन्नर फाटा, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा सोनू काकडे (वय १०) हा १७ जुलैला आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असताना घरी एकटाच होता. ही संधी साधून अज्ञाताने त्याला कसले तरी आमिष देऊन पळवून नेत अपहरण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -