घरताज्या घडामोडीबिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार, भगूरमधील घटना

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार, भगूरमधील घटना

Subscribe

ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अंगणात खेळत असलेल्या ३ वर्षीय मुलाला शेतात ओढत नेत ठार केल्याची खळबळजनक घटना भगूर जवळील दोनवाडे गावाच्या परिसरात शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अंगणात खेळत असलेल्या ३ वर्षीय मुलाला शेतात ओढत नेत ठार केल्याची खळबळजनक घटना भगूर जवळील दोनवाडे गावाच्या परिसरात शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी मुलाचा उसाच्या शेतात शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळून आला. रुद्र राजू शिरोळे असे मृत मुलाचे नाव आहे.

गत आठवड्यात हिंगणवेढे येथे अकरा वर्षीय मुलाचाही बिबट्याने हल्ला करुन बळी घेतला होता त्यानंतर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. यामुळे बिबट्यांची दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -