घरमहाराष्ट्रनाशिकशवविच्छेदनासाठी नातेवाईकांची लूट

शवविच्छेदनासाठी नातेवाईकांची लूट

Subscribe

जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांपासून अनोळखी व्यक्तीचे प्रताप

सुशांत किर्वे

एक महिन्यापूर्वीच (१५ मार्च) महापालिकेचा सफाई कर्मचारी मंगेश साळवेकडे जिल्हा रूग्णालयाचा गोल शिक्का आणि अतिरिक्त शल्यचिकित्सकांचा शिक्का आढळून आल्यानंतर आता जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन कक्षात ३ वर्षांपासून अनोळखी व्यक्ती राजरोसपणे काम करत असल्याचे आढळून आले आहे. शवविच्छेदन वेळेत व्हावे व मृतदेह पांढर्‍या कापड्यात ठेवण्यासाठी तो नातेवाईकांकडून खुलेआम १ हजार ते बाराशे रुपये घेत फसवणूक करत आहे. मात्र, याकडे जिल्हा रुग्णालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

जिल्हा शासकीय रुग्णालयात नैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यावर मृतदेह शव विच्छेदनासाठी आणले जातात. या कक्षात रुग्णालयाचे तीन कर्मचारी कार्यरत आहेत. दिवसा व रात्री प्रत्येकी एक कर्मचारी असतो. तिसरा कर्मचारी दुसर्‍या दिवशी कामावर असतो. शवविच्छेद कक्षाच्या आवारात तीन वर्षांपासून भावड्या नावाचा अनोळखी व्यक्ती आहे. तो रुग्णालयाचा कर्मचारी नसतानाही शवविच्छेदन कक्षाच्या आवारात साफसफाई करतो, वैद्यकीय औषधे घेऊन येतो, मृतदेह उचलण्यास कर्मचार्‍यांना मदत करतो. त्याबदल्यात तो मृतदेहांचे शवविच्छेदन चालू असताना नातेवाईकांशी संपर्क साधतो. शवविच्छेदन वेळेत करण्यासाठी ३०० ते ५०० रुपये मागतो. नातेवाईक दु:खात असल्याने मृतदेहावर वेळेत मिळावा यासाठी त्याला पैसे देतात. तसेच मृतदेह पांढर्‍या कपड्यात ठेवावा लागणार असून त्यासाठी ७०० रुपये खर्च असे सांगून तो नातेवाईकांकडून पैसे घेतो. प्रत्यक्षात हे कापड २५० रुपयांमध्ये भद्रकाली परिसरात उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेला भगदाड पाडण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

देशभर अवयव तस्करीच्या घटना घडत असल्याने जिल्हा रुग्णालयाने वेळीच लक्ष न दिल्यास शवविच्छेदन कक्ष येथूनसुद्धा मानवी अवयवयांची तस्करी होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तीमुळे कक्षातील मृतदेहांची अदलाबदलही होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा जिल्हा कर्मचार्‍यांमध्ये सुरू आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -