घरमहाराष्ट्रनाशिकक्रीडा क्षेत्रातील कर्तृत्वाचे साक्षीदार "महात्मा गांधी मार्ग"

क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्वाचे साक्षीदार “महात्मा गांधी मार्ग”

Subscribe

क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्व, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिपर्व व संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील आंदोलनाचे कवी कुसुमाग्रजांनी केलेले नेतृत्त्व या तीन महत्त्वपूर्ण घटनेच्या वाटचालीचा प्रारंभीचा मार्ग म्हणजे (चांदवडकर) सावरकर पथ अशी या विभागाची ओळख आहे. नाशिक नगरपालिकेच्या स्थापनेनंतर रस्ता रूंदीच्या निमित्ताने असलेले वाडे पाडून मुळात कमला विजय उपहारगृहाजवळ संपणारा रस्ता व पुढे चांदवडकर वाड्यापासून मेनरोडकडे जाणारा रस्ता विकसित करण्यात आला. नेहरू चौक ते मेन रोडपर्यंत रस्ता प्रारंभी चांदवडकर व आता सावरकर पथ या नावाने प्रसिध्द आहे.

पेशवे कालखंडात राजेबहाद्दर, रास्ते, पेठे, डबीर, विंचूरकर व चांदवडकर ही सरदार व जहागीरदार मंडळी. पैकी चांदवडच्या जहागीरदारांचा वाडा सरस्वतीच्या पश्चिमेस व सरस्वतीचा उपविभाग म्हणून शिंगाडा तलाव, खडकाळी, शिवाजी पथ, चित्रमंदिर आणि दक्षिणोत्तर मेनरोड, वैशंपायन व पिंगळे सराफ यांच्या सराफी पेढीपासून आर्यक्षत्रिय मंगल कार्यालयाजवळ उपरोक्त सरस्वतीस मिळणार्‍या जागेलगतचा वाडा चांदवडकरांचा आहे. या घराण्यातील जुन्या पिढीतील श्रीमंत त्र्यंबकराव उपाख्य बाबासाहेब चांदवडकर वाड्यालगत हत्ती, घोडे हा लवाजमा श्रीमंती आहे. त्यांच्याकडील चांदीची भांडी, भोजनावळीसाठी इष्टमित्रांना देऊन ते समारंभास सहकार्य करीत असत. १९१७ च्या सुमारास नाशिक शहरात क्रिकेट या विदेशी खेळाचा क्लब त्यांनी स्थापन केला. ते ख्यातकीर्त नाशिक हायस्कूलचे विद्यार्थी, १९२१ मध्ये क्रिकेट क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाने क्रांती निर्माण झाली. नाशिकमधील महत्त्वाचा नाशिकचा हायस्कूल हा अधिकृत संघ स्थापन झाला.

- Advertisement -

क्रिकेटला सांघिक व उत्तम दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी सामाजिक जाणिवेने त्यांनी पैसा खर्च केला. उत्तम खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी त्यांच्या गौरवार्थ ते चांदीचे पेले भेट देत असत. नाशिकमधून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशाने त्यांनी चांदवडकर शील्ड या पुरस्कारासाठी भव्य चांदीची ढाल विजयी संघासाठी जाहीर केली. क्रिकेटच्या उत्तम खेळासंबंधी त्यांना एका पारशी धनिकाने पाच रूपयांचा रोख पुरस्कार दिला होता. आपल्याकडील बॅटस्, स्टम्प आदी साहित्य ते इतर गरजू संघास देत असत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र नानासाहेब चांदवडकर यांनी आबासाहेबांची मनीषा पूर्ण तर केलीच. तथापि, १९२१ मध्ये शील्ड साठी पहिला सामना उत्साहात झाला. नानासाहेब हे ही उत्तम फलंदाजी करीत. २५ मिनिटांत ११ चौकार मारून नानासाहेबांनी मैदान गाजविले होते. १०० धावा १०० विकेट घेणारे खेळाडू तयार करण्याची त्यांची मनीषा होती. त्यांचे सहकारी वेलदे यांनी १०० झेल घेऊन क्षेत्ररक्षक म्हणून आपला विक्रम नोंदविला. सरदार विंचूरकरांनीही क्रिकेटसाठी ढाली देऊन उत्तेजन दिले होते.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -