घरताज्या घडामोडीदिव्यांग अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दिव्यांग अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Subscribe

त्र्यंबकेश्वरमधील १६ वर्षीय दिव्यांग मुलीवर एकाने अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि.१५) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नितीन संजय लगड (रा. इंदिरानगर, त्र्यंबकेश्वर) याला अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्यांग मुलगी वडील व आजीसोबत त्र्यंबकेश्वरमध्ये राहते. तिच्या आईचे ८ वर्षांपुर्वी निधन झाले आहे. नितीन लगड हा त्यांच्या शेजारी पत्नी व आईवडिलांसमवेत राहतो. पीडितेची आजी रविवारी (दि.१५) सकाळी धुणी-भांडी कामासाठी गेली होती. परतल्यानंतर त्यांना नात घरात दिसली नाही म्हणून त्यांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. शेवटी त्या घराकडे परतल्या तेव्हा नात दारात बसलेली दिसली. तिला विश्वासात घेवून विचारणा केली असता तिने आपबिती सांगितली. घरामागे लघुशंकेसाठी गेली असता नितीन लगड याने तिला उचलून घरात नेले व बलात्कार केला. तसेच, या प्रकाराबाबत कुणालाही सांगू नको, अन्यथा मारुन टाकेन, अशी धमकीही त्याने दिली. पीडितेच्या आजीने नितीन व त्याच्या आईला विचारणा केली असता दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पिडीतेच्या आजीने पोलिसांत धाव घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -