घरCORONA UPDATEनाशिकमध्ये दिवसभरात १ हजार नवे पॉझिटिव्ह, 21 रूग्णांचा मृत्यू

नाशिकमध्ये दिवसभरात १ हजार नवे पॉझिटिव्ह, 21 रूग्णांचा मृत्यू

Subscribe

नाशिक शहरातील 9, नाशिक ग्रामीण 10, मालेगाव व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश

जिल्ह्यात गुरुवारी (दि.२७) दिवसभरात २१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक शहरातील 9, नाशिक ग्रामीण 10, मालेगाव व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. तर, दिवसभरात तब्बल १ हजार ३९ नवे रूग्ण कोरोनापॉझिटिव्ह आढळून आले.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमधील 194, नाशिक शहरातील 807 आणि मालेगाव येथील 38 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3३ हजार 88 वर पोहोचला आहे. त्यात एकट्या नाशिक शहरात २० हजार 308 रूग्णांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आजवर 2६ हजार 596 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 6 हजार २२४, नाशिक शहर १८ हजार 608, मालेगाव 1 हजार ५82 आणि जिल्ह्याबाहेरील १८२ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार 658 रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण १ हजार 715, नाशिक शहर ३ हजार 230, मालेगाव 710 आणि जिल्ह्याबाहेरील ३ रूग्ण आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -