Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी नाशिक महानगरपालिका परिवहन बससेवा १ जुलैपासून सुरु,पहिल्या टप्प्यात ५० डिझेल बस धावणार

नाशिक महानगरपालिका परिवहन बससेवा १ जुलैपासून सुरु,पहिल्या टप्प्यात ५० डिझेल बस धावणार

नाशिक जिल्ह्यात २७ जूनपासून नव्या बसेसच्या ट्रायल रन सुरु होणार

Related Story

- Advertisement -

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नाशिकरांसाठी महानगरपालिका परिवहन बससेवा १ जुलैपासून सुरु होणार आहे. (Nashik Municipal Transport bus service will start from July 1)  अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करत अखेर नाशिकमध्ये महापालिकेच्या बस धावण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात २७ जूनपासून नव्या बसेसच्या ट्रायल रन सुरु होणार आहेत. या ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात एकूण ५० डिझेल बसेस धावणार आहेत. (in the first phase 50 diesel buses will run in nashik ) त्यानंतर टप्याटप्प्यांनी नाशिक शहरात सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. सुरुवातीला तपोवन ते नाशिक रोड, तपोवन ते पवन नगर, पंचवटी ते सातपूर आणि नाशिक रोड ते अंबड या महत्त्वाच्या नऊ मार्गांवरुन या बसेस धावणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहराच्या हद्दीबाहेर अनेक बस पडून आहेत. बसची वाहतूक थांबल्याने त्या खराब होण्याच्या दिशेने आहेत. दररोज बसेस १५ मिनिटांसाठी सुरु करुन ठेवाव्या लागत होत्या. त्यांच्या मेंटनन्साठी अधिकचा खर्च करावा लागत होता. मात्र आता हा सगळा खर्च वाचून पडून असलेल्या बसेस नाशिकरांच्या सेवेत रुजू होणार आहेत.

- Advertisement -

नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असताना शेवटच्या प्रचारसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली. नाशिक दत्तक घेताना त्यांनी महानगर पालिकेच्या परिवहन बस सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. मात्र विरोधी पक्षाकडून या प्रस्तावावर जोरदार विरोध करण्यात आला. मात्र भाजपने हा विरोध हाणून पाडत शेवटी आता १ जुलैपासून आता नाशिकमध्ये महानगर पालिकेची बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

५ वर्षांपासून एसटी मंडळाने टप्प्या टप्प्याने बस सेवा बंद करण्यात सुरुवात केली होती. सुरुवातील सव्वा दोनशे बसमधून सुमारे २० हजार प्रवासी वाहतूक करत होते.  गेल्या वर्षापर्यंत बसच्या १०० फेऱ्या करण्यात येत होत्या मात्र त्यानंतर बस वाहतूक पूर्णपणेच बंद करण्यात आली.


- Advertisement -

हेही वाचा –  शिवप्रसाद दिलाय, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका; राऊतांचा भाजपला इशारा

 

- Advertisement -