घरमहाराष्ट्रनाशिकसप्टेंबरमध्ये धावणार नाशिक-पुणे इलेक्ट्रीक बस

सप्टेंबरमध्ये धावणार नाशिक-पुणे इलेक्ट्रीक बस

Subscribe

एसटी महामंडळाकडून इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनसाठी लगबग

एसटी महामंडळाने 100 इलेक्ट्रीक बस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. या गाड्या मेट्रोसिटीमध्ये अंतर्गत प्रवाशी वाहतूक करणार आहेत. पण महामंडळाने प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रीकबस द्वारे आंतर जिल्हा प्रवाशी वाहतुक करण्यासाठी मुंबई-पुणे आणि नाशिक-पुणे मार्गाची निवड केलेली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक ते पुणे इलेक्ट्रीक बससेवा सुरू होणार आहे. दोन्ही शहरांदरम्यान इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एसटी महामंडळाने निविदा प्रक्रिया राबविली आहे.

नाशिक ते पुणे अंतर 225 किलोमीटर आहे. इलेक्ट्रीक बस एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 250 किलोमीटर धावू शकते. त्यामुळे हा मार्ग प्रायोगिक तत्वावर राबविण्यासाठी मुंबई-पुणे मार्गापेक्षाही महामंडळाला सोईस्कर वाटत असल्याने आणि मार्गही चौपदरीकरण होऊन विस्तारलेला असल्याने या मार्गावर इलेक्ट्रीक बससेवा सुरू करण्याचे महामंडळाने मुक्रर केले आहे. आंतरजिल्हा इलेक्ट्रीक प्रवासी बससेवेच्या मुंबईवर नाशिकने बाजी मारली आहे.
एसटी महामंडळाने 100 नव्या इलेक्ट्रीक बसगाड्या भाडेतत्वावर घेतलेल्या आहेत.

- Advertisement -

या गाड्यांना लांबपल्यावर प्रवास करताना येणार्‍या तांत्रिक अडचणींची चाचणी करण्यासाठी महामंडळाने इलेक्ट्रीक बस पुरवठादारांना चाचणी घेण्याचे सूचीत केलेले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रीक पॉइंटची उभारणी गरजेची आहे. 250 किलोमीटर चालल्यानंतर बस थांबली तर तिला सुमारे 2 तास चार्जिंगसाठी लागते. त्याचबरोेबर एक्सप्रेस वे सारख्या मार्गावर वेग मर्यादेत धावताना इलेक्ट्रीक बसची गती कसोटीला उतरली पाहिजे, याची चाचपणी करण्याचे महामंडळाने गाड्या पुरवठादार कंपनीला सूचवले आहे. चाचणीनंतर इलेक्ट्रीक बस नाशिक,मुंबई आणि पुणेनंतर इतर आंतरजिल्हा मार्गावरही धावू शकतील, असे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे.

प्रतिकिलोमीटर 3 रूपये 35 पैसे

एसटीने भाडे तत्वावर घेतलेल्या इलेक्ट्रीक बसगाड्यांचा मोबदला प्रतिकिलोमीटर 3 रूपये 35 पैसे पुरवठादारांना देण्याचे निश्चित केेलेले आहे. या गाड्यांची किमत सुमारे दोन ते अडीच कोटी रूपये असल्याने गाड्या चालवून मिळणारे उत्पन्न, प्रवाशांचा प्रतिसाद आणि वेगाची कसोटी याचा विचार करून महामंडळ आगामी काळात इलेक्ट्रीक बस चालविण्याची व्यापकता ठरविणार आहे, असे एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातील सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -