घरमहाराष्ट्रनाशिकइंजिन नाही आणि 'साहेबांचा’ फोटोही; कार्यकर्ते संभ्रमात

इंजिन नाही आणि ‘साहेबांचा’ फोटोही; कार्यकर्ते संभ्रमात

Subscribe

राहुल ढिकले यांच्या ’स्वतंत्र’ पोस्टरमुळे कार्यकर्ते संभ्रमात

नाशिक विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच सर्वदूर पक्षांतराचे वारे वाहत आहेत. अशा अस्थिर वातावरणात सध्या मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले यांचे ’पक्षविरहीत’ पोस्टरही चांगलेच चर्चेत आहे. इंजिनही आणि ’राज साहेबांचा’ फोटोच या पोस्टरवर नसल्याने मनसेचे सामान्य कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमित झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेत मनसेने थेट युतीविरोधात राज्यभर रान पेटवले होते. प्रत्यक्षात पक्षाचा हा विरोधही प्रभाव दाखवू शकला नाही. मात्र, या निवडणुकीपासून दूर राहिलेल्या मनसेने निदान आता विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी सामान्य मनसैनिकांची भाबडी अपेक्षा आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राहूल ढिकले यांचे पोस्टर्स रिक्षांवर झळकू लागले आहेत.

या पोस्टर्सवर मनसेचा ध्वज अथवा राज ठाकरे यांचा फोटोच नसल्याने अ‍ॅड. ढिकले यांच्याच भूमिकेबाबत आता सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीच्या निमित्ताने स्वतःचे अस्तित्व आणि प्रभाव दाखवून देण्याची संधी असते. मात्र, निदान अद्याप विधानसभा निवडणुकीच्या निर्णयापासून अलिप्त राहिलेल्या मनसेचे भवितव्य काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.नेमकी कोणती वाट निवडणार याचे कुतूहल लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेले पक्षांतराचे वारे सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहेत. विशेषतः भाजप-शिवसेनेने संपूर्ण निवडणुक एकहाती जिंकली. त्यामुळे विरोधी पक्षांतील दिग्गजांचा ओढा आता शिवसेना-भाजपकडे वाढलेला आहे.

- Advertisement -

अशा सर्व परिस्थितीत ढिकले यांच्या पोस्टरमुळे चर्चेला उधाण आले आहे. मात्र, भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप विधानसभा निवडणुकीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. अशा परिस्थितीत राहुल ढिकले हे राष्ट्रवादीच्या वाटेवर जातील, अशीही मध्यंतरी चर्चा होती. अद्याप तसा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अ‍ॅड. राहुल ढिकले हे नेमक्या कोणत्या वाटेवर जातात, याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -