घरमहाराष्ट्रनाशिकअधिकारी गेले पैसे खाऊन.. रस्ते गेले पावसात वाहून

अधिकारी गेले पैसे खाऊन.. रस्ते गेले पावसात वाहून

Subscribe

नाशिक : जय जय राम कृष्ण हरी, पैसा जाई अधिकार्‍यांच्या घरी.., अधिकारी गेले पैसे खाऊन, पहिल्याच पावसात रस्ते गेले वाहून.., अशा शब्दांत टाळाच्या गजरात भजन सादर करत नाशिकरोड येथील धोंगडेनगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे महापालिकेच्या विभागीय अधिकारी यांच्या दालनात टाळ वादन करत शहरातील खड्ड्यांप्रश्नी आंदोलन करण्यात आले.

शहरातील रस्ते अक्षरशः खड्ड्यांत गेले आहेत. शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुरूम टाकून बुजविलेल्या खड्ड्यांमधील खडी रस्त्यावर पसरून अपघातांत वाढ झाली आहे. त्यातच गॅस पाईपलाईन तसेच, स्मार्ट सिटीसाठी रस्ते खोदण्यात आले. नागरिकांनी ओरड केल्यानंतर घाईघाईने हे रस्ते बुजविण्यात आले असले तरी सध्याची रस्त्यांची दूरवस्था पाहता नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने अपघात घडत आहेत. यातून अपघातांचा धोका असून याची जबाबदारी ही पूर्णपणे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांची आहे, त्यामुळे त्वरित रस्ता दुरुस्ती करा अशी मागणी धोंगडेनगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे पालिका विभागीय अधिकारी यांच्या दालनात टाळवादन करत आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी नाशिकरोड बांधकाम विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी धोंगडे नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल प्रकाश धोंगडे, विकी पाटील, गुरुमित सिंह, चेतन कुलथे, राजु शिंदे, अतुल चव्हाण, आदित्य धोंगडे, यश हरदे, गौरव सोनावणे, राहुल राऊत, गौरव पेंढारी, शिवा धोंगडे, गौरव हांडोरे, विशाल व्यवहारे हे उपस्थित होते.

पावसामुळे रस्ते खराब झाले असून, संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्यात आली आहे. ठेकेदार पुन्हा डांबरीकरण करून देणार आहे. : निलेश साळी, बांधकाम अभियंता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -