घरमहाराष्ट्रनाशिकशहरात लवकरच १६ ठिकाणी ऑन स्ट्रीट पार्किंग

शहरात लवकरच १६ ठिकाणी ऑन स्ट्रीट पार्किंग

Subscribe

स्मार्ट सिटी कंपनीने बीओटी तत्वावर स्मार्ट पार्किंग राबवण्याचा निर्णय

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात १५ ठिकाणी साकारण्यात आलेल्या स्मार्ट पार्किंगची कोरोना काळात पुरती वाट लागली. आता पुन्हा एकदा १६ ठिकाणी ऑन स्ट्रीट म्हणजे रस्त्याच्या कडेला पार्किंगची सेवा सुरु होणार आहे. ही सेवा सशुल्क असल्याने अनेक नगरसेवकांनी त्याला विरोध केला आहे.
शहरातील वाहतुकीची होणारी कोंडी पाहता स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने बीओटी तत्वावर स्मार्ट पार्किंग राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २८ ऑन स्ट्रीट आणि पाच ठिकाणी मोकळ्या मैदानात पार्किंगचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २२ पार्किंगचे ठिकाणे ठेकेदाराने तयार केले असून त्यातील १६ रस्त्यांवर वसुलीसाठी कंपनीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच पार्किंगची ही व्यवस्था कार्यान्वित होणार आहे. पालिकेच्या निर्णयानुसार दुचाकीला पाच रुपये तर चारचाकी वाहनाला दहा रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहे. अ‍ॅपद्वारे नियंत्रण
स्मार्ट पार्किंगसाठी कंपनीच्या वतीने अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. निवडक ठिकाणी पार्किंगसाठी किती जागा शिल्लक आहे. असल्यास त्या जागा पोहोचण्यापूर्वी बुक करता येणार आहे. पार्किंगच्या ठिकाणी रस्त्यांवर सेन्सर व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्मार्ट पार्किंग जेथे आहे तेथे चार चाकी वाहनांकरिता सेंसर्स लावले आहेत. गुगल प्ले स्टोअरला किंवा आयओएसवरून ‘नाशिक स्मार्ट पार्किंग’ हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणार आहे. स्मार्ट पार्किंगचे शुल्क ऑनलाइन आणि ऑफलाइनदेखील अदा करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -