घरताज्या घडामोडीघरपोहोच भाजीपाल्याचे अ‍ॅप ‘कृषी बास्केट’

घरपोहोच भाजीपाल्याचे अ‍ॅप ‘कृषी बास्केट’

Subscribe

मविप्र शिक्षण संस्था व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अभिनव उपक्रम

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शहरातील नागरीकांना घरपोच भाजीपाला मिळणार आहे. ‘कृषी बास्केट’ या अ‍ॅपद्वारे एका आठवड्याचा ऑरगॅनिक भाजीपाला पोहोच केला जाणार असून, त्याचे पैसे ऑनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत भाजीपाला घेण्यासाठी बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मविप्र शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा संदिप जगताप यांनी ऑनलाईन घरपोहोच भाजीपाला ही संकल्पना सुरु केली. नाशिक शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला माफक दरात घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. सदर व्यवस्था करताना करोना व्हायरस नियंत्रणाची सर्व नियम पाळले जाणार आहेत. हा भाजीपाला घरपोच मिळणार असून ’कृषी बास्केट’द्वारे ऑर्डर बुक करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी भाजीपाल्यासाठी प्रा भामरे 9421159774 व
पवन भोये 8928164478 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
&.
नियम अटी
-सेवा नाशिक शहारामधील नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
-एक आठवडाभर पुरेल असा साधारणत: कमीत कमी 300 रुपयांची ऑर्डर द्यावी
– भाजीपाला डिलीव्हरीसाठी आल्यास इमारतीच्या गेटवर पोच घ्यावी
-ऑर्डरची रक्कम शक्यतो गूगल पे अथवा फोन पे अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे क्यु आर कोडच्या डिजिटल पद्धतीने द्या
– ऑनलाईन शक्य नसल्यास सदर रक्कम सुट्टे स्वरूपात रोख द्यावी लागेल
-सर्वांनी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक
-भाजीपाल्याची डिलीव्हरी 24 तासाच्या आत देण्यासाठी प्रयत्नशील
-नाशिक शहर मर्यादित कोणतेही डिलिव्हरी चार्ज घेतले जाणार नाही

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -