घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात उशिरापर्यंत चालणार पार्ट्या; हॉटेल १२.३० तर मद्यविक्रीला ११.३० वाजेपर्यंत परवानगी

नाशकात उशिरापर्यंत चालणार पार्ट्या; हॉटेल १२.३० तर मद्यविक्रीला ११.३० वाजेपर्यंत परवानगी

Subscribe

नाशिक : राज्य सरकारच्या नियमानुसार नाशिक शहरात खाद्यपदार्थ व मद्यविक्री दुकाने रात्री ११:३० वाजेपर्यंत व बार मध्यरात्री दीडपर्यंत खुले ठेवता येणार आहेत. हॉटेलिंगही मध्यरात्री साडेबारापर्यंत करता येणार आहे. या नियमानुसारच रात्री आस्थापनांची वेळ पाळली जाणार आहे, यासंदर्भात नाशिक शहरातील १२ पोलीस ठाण्यांना आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक शहरात रात्री दहा वाजेच्या सुमारास गस्ती पथकांकडून सायरन वाजवून सर्व आस्थापना बंद करण्याबाबत कार्यवाही करण्यात येते. ज्या आस्थापना विहीत वेळेनंतरही सुरू असतात, त्यांच्यावर वेळोवेळी नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र, राज्य शासनाच्या आदेशानुसार आस्थापनांच्या प्रकारानुसार त्या बंद करण्याबाबतचे निर्देश वेगवेगळे आहेत. या निर्देशांबाबत आयुक्तालय हद्दीतील सर्व पथकांना सूचित करण्यात आले आहे. हे बदल नव्याने झाले नसून, २०१६ मध्ये निघालेल्या शासन आदेशानुसार कार्यालयीन कामकाजासाठी सर्व पथकांना कळविले आहे. शासन आदेशात नमूद वेळेनुसारच आस्थापना बंद होणे अपेक्षित असून, त्यानुसारच संबंधितांवर कारवाई करावी, असे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी, कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम, डेस्कोथेक, खेळमेळे व तमाशे यांसारख्या कार्यक्रमांना पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या परवान्याची आवश्यकता नाही. मात्र स्थानिक पोलिस ठाण्याकडे त्यासंदर्भात कळविणे बंधनकारक असेल. मात्र, बंदीस्तऐवजी खुल्या ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक राहणार आहे.

आस्थापना बंद होण्याची वेळ (आयुक्तालय हद्द)
  • देशी मद्यविक्री : रात्री १० 
  • खाद्यपदार्थ व मद्यविक्री दुकाने : रात्री ११.३०
  • हॉटेल : मध्यरात्री १२:३०
  • थिएटर्स, सिनेमा प्रदर्शन गृहे : मध्यरात्री ०१:००
  • परमिट रूम, बिअर बार, डिस्कोथेक : मध्यरात्री ०१:३०
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -