घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपेट्रोल दरवाढीची वाटचाल ११० रूपयांकडे

पेट्रोल दरवाढीची वाटचाल ११० रूपयांकडे

Subscribe

डिझेलच्या दरात मात्र १६ पैशांची घट

पेट्रोल दरवाढीची मालिका अद्यापही सुरुच आहे. सोमवारी पेट्रोल २७ पैशांनी वाढून १०७.६२ रुपयांवर पोहचले. गेल्या अडीच महिन्यांपासून दर दिवसाआड किंवा सलग पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांची दरवाढ होत आहे. रविवारी दर स्थिर राहिल्यानंतरडिझेलच्या दरात मात्र गेल्या चार महिन्यांत प्रथमच १६ पैशांची घट होऊन ते ९६.२२ रुपये प्रतिलिटर झाले. शनिवारी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या दरांत पुन्हा वाढ झाली होती. पेट्रोल ३३ पैशांनी वधारून १०७.३५ रुपयांवर, तर डिझेलमध्ये २७ पैशांची वाढ होऊन ते ९६.३८ रुपयांवर गेले होते. सोमवारी पुन्हा त्यात २७ पैशांची वाढ झाली. दि. २५ मे रोजी पेट्रोलने प्रथमच शंभरी पार केली होती. सोमवारी प्रथमच डिझेलचे दर १६ पैशांनी कमी झाल्याने दिलासा मिळाला. मात्र पेट्रोलच्या दरात २७ पैशांनी वाढ झाल्याने वाहनचालकांच्या खिशाला झळ पोहचणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -