घरमहाराष्ट्रनाशिकपिंपळगाव बसवंत : नगरपरिषदेसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले

पिंपळगाव बसवंत : नगरपरिषदेसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले

Subscribe

पिंपळगाव बसवंत : पिंपळगावचा वाढता विस्तार पाहता ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करण्यासाठी येथील सर्वपक्षीय पुढारी एकवटले परस्परांना राजकीय शह-काटशह देणारी मनसुबे व युवा नेत्यांनी नगरपरदेशीसाठी एकमेकांच्या सुरात सूर आवळला. ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव सहविचार सभेत करण्यात आला. नगरपरिषदेसाठी सर्वपक्षीय गटाचे नेते, कार्यकर्ते कधी नव्हे ते एकत्र आल्याचे अभूतपूर्व चित्र पिंपळगाव बसवंतमध्ये दिसले आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थित संपन्न झालेल्या बैठकीमुळे नगरपरिषद होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
पिंपळगाव बसवंतला नागरपरिषद होईल त्याचे श्रेय कोणी घेणार नसून ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे, गाव करी तर राव काय करील त्यामुळे ग्रामस्थांची इच्छा ती पूर्ण करण्यासाठी मी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे मत आमदार दिलीप बनकर यांनी व्यक्त केले.

नगरपरिषदेसाठी शगुण हॉलमध्ये सहविचार सभा झाली. त्यात आमदार दिलीप बनकर, निफाड तालुका एज्युकेशनचे उपाध्यक्ष भास्करराव बनकर, सरपंच अलका बनकर, विश्वास मोरे, पिंपळगाव मार्केट बँकेचे जेष्ठ संचालक अशोक शहा, दिलीप मोरे उपस्थित होते. माजी सरपंच आणि निफाड एज्युकेशनचे उपाध्यक्ष भास्कर बनकर म्हणाले की, नागरिकांचा गैरसमज दूर करण्यासाठी आजूबाजूतील ग्रामपंचायत नगरपरिषदेच्या करा बाबत माहिती घ्यावी आणि येत्या 2 ऑक्टोबरला समस्त नागरिकांना त्याची जाणीव करून द्यावी जेणेकरून नगरपरिषद विषयी त्यांच्या मनात गैरसमज राहणार नाही आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून नगरपरिषद ही पिंपळगावसाठी काळाची गरज असल्याची भूमिका बापूसाहेब पाटील यांनी मांडली, राजकीय हेवेदावे दूर ठेवून नगरपरिषेसाठी हा एकोपा कायम राखावा. दीड महिन्यांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणीही उमेदवारी अर्ज न भरता बहिष्काराचे अश्र वापरण्याची भूमिका मविप्रचे माजी संचालक दिलीप मोरे, सुरेश खोडे, अशोक शहा, गणेश बनकर, दिगंबर लोहिते, संतोष गांगोडे, राजा गांगोडे व्यक्त केले. येत्या दोन ऑक्टोबरला होणार्‍या ग्रामसभेत नगर परिषद ठराव करण्यावर एकमत झाले. हात उंचावून नगरपरिषद झालीच पाहिजे अशी घोषणा यावेळी देण्यात आली.

- Advertisement -

बैठकीस आमदार दिलीप बनकर, माजी सरपंच भास्कर बनकर,दिलीप मोरे,सुरेश खोडे,गणेश बनकर, सरपंच अलका बनकर, बापूसाहेब पाटील, सतीश मोरे, जयंत मुथा, नितीन बनकर, आशिष बागुल, विश्वास मोरे, किरण लभडे, गीतेश बनकर, संजय मोरे, राजा गांगुर्डे, सुहास मोरे, रवींद्र मोरे, प्रशांत घोडके, जितू खोडे, भाऊसाहेब खैरनार, मनोज मुथा, संतोष गांगुर्डे, दत्तू मोरे, मनोज शेवरे, प्रवीण मोरे, बाळासाहेब बनकर, सोमनाथ मोरे, लक्ष्मण खोडे, सत्यभामा बनकर,अतुल शहा, शंकर ठक्कर, अशोक शहा, सत्यजित मोरे, सुजित मोरे, संतोष अहिरराव, चिंदु काळे, संदीप झुटे, लोहिते मामा, केतन पुरकर, बाळासाहेब आंबेकर, केशव बनकर, दत्तू जाधव, आल्पेश पारख, चंदू विधाते, पंढरीनाथ देशमाने आदीसह सर्वपक्षीय नेते पुढारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -