घरमहाराष्ट्रनाशिकवार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धेत ‘मुख्यालय’ची बाजी

वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धेत ‘मुख्यालय’ची बाजी

Subscribe

सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांचेकडून मात्र मान्यवरांची अडवणूक

पोलीस आयुक्तालयातर्फे २८ वी वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. यात पोलीस मुख्यालय संघासह खेळाडूंनी वैयक्तिक स्पर्धांमध्ये बाजी मारली. स्पर्धेचा समारोप सोहळा गुरुवारी (ता.२९) पोलीस आयुक्तालय येथे झाला. सांघिक स्पर्धेत पोलीस मुख्यालय पुरुष संघाने चार खेळांमध्ये तर पोलीस मुख्यालय महिला संघाने तीन खेळांमध्ये प्रथम क्रमांक पटकविला; मात्र स्पर्धेनंतर झालेल्या परितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी पत्रकारांसह निमंत्रित मान्यवरांना अडवणूक केल्याने अनेक मान्यवरांनी नाराजीमुळे समारोपाच्या कार्यक्रमापासून अंतरावरच थांबले.

वैयक्तिक विजेत्यांमध्ये बेस्ट अ‍ॅथेलिक संतोष बुजडे (पोलीस मुख्यालय) व पुष्पा कहांडुळे (पोलीस मुख्यालय) यांचा समावेश आहे. स्पर्धेची जनरल चॅम्पियनशीप पोलीस मुख्यालय टीमने पटकविली. पोलीस आयुक्तालयातर्फे गुरुवारी (ता.२९) २८ वी वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा २०१९ समारोप सोहळ्याचे आयोजन पोलीस आयुक्तालय येथे करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, आर्टीलरी देवळालीचे लेफ्टनंट कर्नल विवेक शर्मा, लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारिया, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, विजय खरात, माजी सभागृह नेते दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisement -

सांघिक व वैयक्तिक विजेते : फुटबॉल (पुरुष) – पोलीस मुख्यालय संघ, हॉकी – पोलीस आयुक्तालय संघ, व्हॉलीबॉल – परिमंडळ दोन संघ, कबड्डी – परिमंडळ दोन संघ, बास्केटबॉल – पोलीस मुख्यालय संघ, खो खो – परिमंडळ एक संघ, हॅन्डबॉल – पोलीस आयुक्त कार्यालय व सर्व शाखा, व्हॉलीबॉल (महिला) – पोलीस मुख्यालय संघ, बास्केटबॉल – पोलीस मुख्यालय, खो खो – परिमंडळ दोन संघ, कबड्डी – पोलीस मुख्यालय संघ, बेस्ट अ‍ॅथेलिक (वैयक्तिक) – संतोष बुजडे (पोलीस मुख्यालय), पुष्पा कहांडुळे (पोलीस मुख्यालय), जनरल चॅम्पियनशीप – पोलीस मुख्यालय टीम.

सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांचेकडून मात्र मान्यवरांची अडवणूक

पारितोषिक वितरण सोहळा पूर्वनियोजनानुसार कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला. मात्र, पावसामुळे तो आयुक्तालयात घेण्यात आला. समारंभासाठी राजकीय, उद्योजक, सेवाभावी संस्थांच्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. सभागृहाबाहेर तैनात असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी अनेकांना सभागृहात प्रवेश नाकारला. त्यामुळे निमंत्रित असलेल्यांसह काही पत्रकारांनाही कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. नाराज मान्यवरांना सहायक आयुक्तांनी उर्मटपन्ना दाखवला. कार्यक्रम संपेपर्यंत बाहेर थांबलेल्यांनी ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -