घरक्राइमपतीला सेल्फी पाठवण्याची धमकी देत बलात्कार

पतीला सेल्फी पाठवण्याची धमकी देत बलात्कार

Subscribe

भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल

नाशिक : शेअर चॅटवर ओळख झालेल्या महिलेसोबत सेल्फी काढून तो पतीला पाठवण्याची धमकी देत मुंबईतील एका तरुणाने महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी मुंबईतील अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची मुंबईतील तरुणाशी शेअर चॅटवर ओळख झाली होती. तरुणाने महिलेशी ओळख वाढवली. त्यातून दोघांमध्ये मैत्री झाली. तरुणाने महिलेचा विश्वास संपादन केला. त्याने तिला शिर्डी येथे देवदर्शनासाठी बोलावले. या ठिकाणी तिच्यासोबत सेल्फी काढला. त्यानंतर त्याने पतीला सेल्फी देत लग्न मोडण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने १८ ते २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत वणी व त्र्यंबकेश्वर येथे तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने तिला मारहाण व दमदाटीही केली. याप्रकरणी पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. पवार करत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -