घरमहाराष्ट्रनाशिकसाहसी क्रिडा पर्यटनासाठी नोंदणी बंधनकारक

साहसी क्रिडा पर्यटनासाठी नोंदणी बंधनकारक

Subscribe

नाशिक : सर्व प्रकाराच्या साहसी पर्यटनाचा व्यवसाय करणार्‍या राज्यातील सर्व संस्था, कंपन्यांना सरकार दरबारी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्य सरकाने २४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे साहसी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत राज्यात जमीन, हवा आणि जलाशयामध्ये साहसी पर्यटन करणार्‍या सर्व व्यावसायिकांची माहिती संकलन करण्याचे काम सुरू झाले आहे.

गेल्या दोन दशकांत साहसी पर्यटनाची लाट आली आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यात अनेक हौशी लोकांनी साहसी पर्यटनाचा व्यवसाय थाटला आहे. या अनियंत्रित पर्यटनाला शिस्त आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी लक्षात घेऊन राज्याने पर्यटन आणि साहसी उपक्रम धोरण जाहीर केले आहे. साहसी पर्यटन धोरणाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. यामध्ये गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, पॅराग्लायडिंग, बोटिंग इत्यादी विविध प्रकारचे साहसी पर्यटनाचा समावेश आहे. याअनुषंगाने नाशिक विभागातील साहसी उपक्रम आयोजित करणार्‍या संस्था अथवा व्यक्तींनी पर्यटन संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी कळविले आहे.

- Advertisement -
इथे करा नोंदणी

व्यावसायिक संस्थांसाठी https://www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्राथमिक नोंदणीचा अर्ज उपलब्ध आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन असून, संस्थाचालकाची, साहसी मोहीम उपक्रमांची सविस्तर माहिती भरावी लागणार आहे.प्रति साहसी प्रकार 500 रूपये शुल्क असून अर्ज सादर केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नोंदणी न करता साहसी उपक्रमांचे आयोजन केल्यास 25 हजार रूपये दंड, साहित्य जप्ती व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान जवळ नाशिक -422001, दूरध्वनी क्रमांक 0253-2995464 / 2970049 व [email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा. : मधुमती सरदेसाई-राठोड, पर्यटन उपसंचालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -