घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकळसुबाई शिखरावरून एक हजार पर्यटकांच रेस्क्यू; अखेर पाच महिन्यासाठी पर्यटन बंद

कळसुबाई शिखरावरून एक हजार पर्यटकांच रेस्क्यू; अखेर पाच महिन्यासाठी पर्यटन बंद

Subscribe

अहमदनगर : कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला पूर आल्यामुळे सुमारे एक हजार पर्यटक नुकतेच अडकून पडले होते. या पर्यटकांची राजूर पोलीस आणि जहागीरदार वाडीतील युवकांनी सुखरूप सुटका केली. शिवाय, बेशिस्त पर्यटकांमुळे आता नोव्हेंबर अखेरपर्यंत ट्रेकिंगसह मुक्काला मनाई करण्यात आली असून, पोलिसांच्या मदतीने आता गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील कळसूबाई शिखरावर नुकतेच एक हजार पर्यटक अडकले. त्यांना पावसामुळे पर्वतावर जाऊ नये, हा सल्ला दिला होता. तरीही नियम झुगारून अनेकजण तिथे गेले. त्यामुळे पोलीस, वन पथकासह ग्रामस्थांची धावपळ झाली. वेळीच मदत मिळाल्याने अनर्थ टळला. परिणामी, नाशिक वन्यजीव विभागाने अभयारण्य क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार कळसूबाई, सांदण दरी, हरिश्चंद्रगड, रतनगड, अमृतेश्वर मंदिराजवळील धबधबे, भंडारदरा व घाटघर धरण, रंधा धबधबा येथे पर्यटकांची तपासणी होणार आहे. ट्रेकिंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासह गर्दी वाढल्यास पर्यटन बंदी लागू करण्याचे आदेश वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

वनविभागाच्या सूचना

  • सांदण दरीसह डोंगरांवर ट्रेकिंग बंद
  • नोंदणीकृत पर्यटकांनाच अभयारण्यात प्रवेश
  • मद्यप्राशन, बाळगणे, वाहतूक, विक्री करणार्‍यांवर गुन्हे
  • धोकादायक ठिकाणी फोटोसेशन, सेल्फीला मनाई
  • धबधब्यालगत, पाण्यात पोहण्यास मज्जाव
  • गाणी वाजविणारे, हुल्लडबाजी करणार्‍यांवर गुन्हे
  • वेळेप्रसंगी संचारबंदी लागू करण्याचा विचार
  • जंगलक्षेत्रासह गड-किल्ल्यांवर रात्री मुक्कामास बंदी
  • २५ पेक्षा अधिक आसन क्षमतेच्या वाहनांना मनाई
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -