घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकाय पाऊस, काय पुर, काय खड्डे.. एकदम ओक्के; छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना...

काय पाऊस, काय पुर, काय खड्डे.. एकदम ओक्के; छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Subscribe

नाशिक : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (दी.१४) नाशिक मधील पुर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी बोलतांना भुजबळ यांनी राज्य सरकारला आमदार शहाजी बापू पाटील यांचा डायलॉगप्रमाणे “काय पाऊस, काय पुर, काय खड्डे.. एकदम ओके” असा खोचक टोला लगावला.

यावेळी भुजबळ यांनी सांगितले, मुंबईहून नाशिककडे येतांना मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याच दिसून आल. मुंबईसह ठाणे, भिवंडी याभागात अक्षरशः रस्त्याची चाळण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. नागरिकांना, चाकरमान्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याच सोबत खडयामुळे रस्ते वाहतुकीसाठी अतिशय धोकेदायक बनले आहेत. त्यातून अपघात संभवू शकतात. भिवंडी ते नाशिक रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नाशिककडे येणाऱ्या वाहनांनाही जागोजागी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मूळचे ठाण्याचेच असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री यानात्याने एमएमआरडीए पासून ते पीडब्लुडी पर्यंत सगळी खाती आहेत. त्यामुळे ते लवकर हे रस्ते खड्डेमुक्त करतील असा टोलाही भुजबळ यांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

जिल्ह्यातील पुराचा आढावा

दरम्यान, छगन भुजबळ यांनी आज गोदावरीच्या पुर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांची भेट घेत परिस्थितीचा तसेच उपाययोजनांचा माहिती घेतली. तसेच जिल्ह्याच्या धरणातून पाणी सोडतांना नागरिकांना सतर्कतेच्या योग्य माहिती देण्याच्या सूचना केल्या. तसेच महापालिका प्रशासनालाही शहरातील खड्ड्यांच्या बाबत आवाहन केल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -